इको-प्रोतर्फे बावडी-विहिरीची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 10:25 PM2018-09-16T22:25:56+5:302018-09-16T22:26:27+5:30
इको-प्रो संस्थेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जंयतीनिमित्त आयोजीत स्वच्छता पंधरावाडा स्वच्छता ही सेवा अंतर्गत शहरातील एतिहासिक गोंडकालीन बावडी-विहिर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानास केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी भेट देऊन पाहणी करीत या उपक्रमाचे कौतुक केले व प्रशासकीय पातळीवर सहकार्य करण्याचे आश्वासन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : इको-प्रो संस्थेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जंयतीनिमित्त आयोजीत स्वच्छता पंधरावाडा स्वच्छता ही सेवा अंतर्गत शहरातील एतिहासिक गोंडकालीन बावडी-विहिर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानास केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी भेट देऊन पाहणी करीत या उपक्रमाचे कौतुक केले व प्रशासकीय पातळीवर सहकार्य करण्याचे आश्वासन केले.
महात्मा गांधी यांच्या जंयतीनिमित्त देशभरात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत आहे. या राष्ट्रीय स्तरावर सरकारने सुरू केलेल्या अभियानात सहभाग म्हणून शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन बावडया-विहिरीची स्वच्छता करण्याच्या कामास शनिवारपासून सुरूवात करण्यात आली. सदर विहिर प्राचीन असून शहरातील बऱ्याच ठिकाणी आहेत. मात्र या दुर्लक्षित आणी केरकचरा टाकण्याचे ठिकाण झाले आहे. गोंडराज्य निर्मिती करीत असताना किल्ला-परकोट सह रामाळा तलावासोबत शहरात गोंडकालीन पाणी पुरवठा व्यवस्था अधिक प्रभावीपणे तयार केलेल्या दिसून येतात. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे इको-प्रोने पुढाकार घेऊन बाबुपेठ बायपास रोडवरील सोना माता मंदिर, मराठा चैकातील प्राचीन विहिरीपासून स्वच्छता मोहिम सुरु करण्यात आली. या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे, इको-प्रो पुरातत्व विभागाचे प्रमुख रवी गुरनुले, नितीन रामटेके, नितीन बुरडकर, बिमल शहा, कपील चैधरी, प्रमोद मलीक, सुमीत कोहळे, राजेश व्यास, मनिष गांवडे, अनिल अडगुरवार, ओमजी वर्मा, राजू हाडगे, जितेंद्र वाळके, हरीश मेश्राम, अमोल उटट्लवार, अतुल रांखुडे, सचिन धोतरे, प्रगती मार्कंडेवार, मनीषा जयस्वाल, पुजा गहुकार, सारीका वाकुडकर, सनी दुर्गे आदी सहभागी आहेत.