श्रमदानातून राबविले किल्ल्यात स्वच्छता अभियान

By admin | Published: October 9, 2016 01:33 AM2016-10-09T01:33:58+5:302016-10-09T01:33:58+5:30

येथील ऐतिहासिक किल्याचे आत सर्वत्र झाडे झुडूप आणि गाजर गवत यांचा कचरा झाला आहे.

Cleanliness drive through the labor force in Rabwil Fort | श्रमदानातून राबविले किल्ल्यात स्वच्छता अभियान

श्रमदानातून राबविले किल्ल्यात स्वच्छता अभियान

Next

बल्लारपूर : येथील ऐतिहासिक किल्याचे आत सर्वत्र झाडे झुडूप आणि गाजर गवत यांचा कचरा झाला आहे. या हिरव्या कचऱ्याने किल्ल्यातील काही दर्शनीय वास्तू झाकोळल्या गेल्या आहेत. याकरिता उगवलेला कचरा कापणे आवश्यक आहे.
बल्लारपूरचे मुख्याधिकारी विपीन मुदधा यांनी म. गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त श्रमदानाने स्वच्छतेची सुरुवात केली. या मोहिमेच्या प्रारंभदिनी तहसीलदार विकास अहीर, पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, नगरसेवक, होमगार्ड चमू, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे, ग्रामीण रुग्णालयाची चमू, निरंकारी मंडळ, जेसिस क्लब, रोटरी क्लब, भालेराव पब्लिक स्कूलचे प्राध्यापक, कर्मचारी तद्वतच नगराध्यक्ष छाया मडावी, मुख्याधिकारी मुद्धा, सभापती सिक्की यादव, माजी नगराध्यक्ष घनशाम मुलचंदानी, गटनेते देवेंद्र आर्य आदींनी भाग घेऊन सुमारे एक हेक्टर जागेवरील कचरा नाहीसा केला.
कचरा उन्मूलनाची श्रमदानाची ही मोहीम चालूच असून यात सेवाभावी संस्था, महिला यांनी भाग घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी मुदधा यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Cleanliness drive through the labor force in Rabwil Fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.