श्रमदानातून किल्ल्याची स्वच्छता
By admin | Published: June 7, 2017 12:49 AM2017-06-07T00:49:21+5:302017-06-07T00:49:21+5:30
इको-प्रो संस्थेच्या वतीने १ मार्चपासून नियमीतपणे श्रमदानातून चंद्रपूर किल्ल्याची स्वच्छता केली जात आहे.
चंद्रपूर : इको-प्रो संस्थेच्या वतीने १ मार्चपासून नियमीतपणे श्रमदानातून चंद्रपूर किल्ल्याची स्वच्छता केली जात आहे. जवळपास ९ किमी लांब असलेला परकोटचे ४ दरवाजे, ५ खिडक्या व ३९ बुरूजांचा स्वच्छतेत समावेश आहे. स्वच्छता अभियान राबविताना बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत. मात्र स्वच्छतेचे काम सुरूच असून या कामाचे महापौर अंजली घोटेकर यांनी कौतूक केले.
स्वच्छता करताना वृक्षवेली, झाड-झुडपे व कचरा सोबतच मोठ्या प्रमाणात या किल्ल्यावर माती असल्याने ती साफ करणे सुध्दा जिकरीचे आणि मेहनतीचे काम आहे. या किल्लाच्या बरूजावर साफ सफाई सुरू असताना लक्षात आले की, कित्येक वर्षात या ऐतिहासिक वारसाकडे दुर्लक्ष झाल्याने गोंडकालीन वास्तूचा विसर पडत आहे. या किल्लावर बरेच असामाजिक घटना घडत असल्याने सर्वसामान्य नागरिक सुध्दा येथे भटकत नाही. यामुळे हा वारसा खंडार आणि अतिक्रमणाखाली आलेला आहे. चंद्रपूर शहराची वैभवशाली गाथा सांगणारे तसेच संपूर्ण महाराष्ट्र प्रसिध्द असलेले पुरातत्वकालीन किल्ला चंद्रपूर शहराचा गौरव आहे. या किल्लाचा निर्माण गोंड राजे व राणी हिराई यांनी केले होते. परंतु काही वर्षापासून किल्ल्याच्या परकोटची साफसफाई न झाल्याने किल्ल्याचे सौंदर्य कमी होत असल्याचे दिसून येत होते.
दुपारी रस्ते ओस
परकोट्याच्या आजुबाजुला अतिक्रमण वाढल्याने परकोट्याचे सौंदर्य नष्ट होत आहे. स्वच्छ भारत अभियानअंतर्गत इंको प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे व कार्यकर्त्यांनी स्वंयस्फृ तीने गोंडकालीन किल्ल्याच्या परकोटची साफ सफ ाईला सुरूवात केली. स्वच्छता सुरूच असून या कामाचे महापौर घोटेकर यांनी कौतूक केले आहे.