लोकसहभागातून किल्ल्याची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 12:39 AM2017-10-05T00:39:41+5:302017-10-05T00:39:52+5:30
‘राव न करी ते गाव करी’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. याची प्रचिती बल्लारपूर येथील ऐतिहासीक किल्ल्याच्या कचरा सफाई अभियान दरम्यान दिसून आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : ‘राव न करी ते गाव करी’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. याची प्रचिती बल्लारपूर येथील ऐतिहासीक किल्ल्याच्या कचरा सफाई अभियान दरम्यान दिसून आली.
बल्लारपूर येथे सोळाव्या शतकात गोंडकालीन राजाने वर्धा नदीच्या काठावर किल्ला बांधला. काळाच्या ओघात हा किल्ला जीर्ण अवस्थेत होता. सर्वत्र कचºयाचे साम्राज्य होते, वाढलेल्या झाड-झुडपांमुळे किल्ल्याचे अस्तित्व धोक्यात आले होते. मात्र येथील नगर पालिका प्रशासनाने लोकसहभागातून या ऐतिहासीक किल्याला संजीवनी देण्याचे काम केले आहे.
नगर पालिका प्रशासनाने किल्ल्यातील कचरा सफाईच्या कामाला आवाहन केले होते. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कामाला सुरुवात झाली. यात शहरातील नागगरिक, स्वयंसेवी व सेवाभावी संस्था, लोकमत सखी मंचचे सदस्य, पत्रकार, मैदानी खेळ गाजवणारे आखाड्यातील कबड्डीपट्टू, नगरसेवक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. जवळपास महिनाभर चाललेल्या या कचरा सफाई अभियानात नगर पालिका कर्मचाºयांचे विशेष योगदान होते. ते महिनाभर सतत या कामात जुपले होते.
या कामाचा पाठपुरवठा नगराअध्यक्ष हरीश शर्मा व मुख्याधिकारी विपीन मुद्धा सातत्याने करत होते. आज या किल्ल्याचा कायापालट झाल्याचे जाणवते. किल्ला परत आपल्या मूळ रुपात दिसू लागला आहे. कचरा सफाई अभियानाच्या निमित्ताने अनेक चांगले काम राबिवता येतात, असे येथील नगारिकांनी दाखवून दिले आहे.