झरपट नदी पात्राची लोकप्रतिनिधींनी केली स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:51 PM2018-09-15T22:51:21+5:302018-09-15T22:51:40+5:30
केंद्र शासनाच्या 'स्वच्छता ही सेवा 'या कार्यक्रमांतर्गत लोकप्रतिनिधींनी शनिवारी झरपट नदीची स्वच्छता केली. या मोहिमेत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी श्रमदान केले. मोहिमेला करण्यापूर्वी उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली. जिल्हा परिषदच्या वतीने तीर्थक्षेत्र वढा येथून उपक्रमाचा शुभारंभ केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र शासनाच्या 'स्वच्छता ही सेवा 'या कार्यक्रमांतर्गत लोकप्रतिनिधींनी शनिवारी झरपट नदीची स्वच्छता केली. या मोहिमेत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी श्रमदान केले. मोहिमेला करण्यापूर्वी उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली. जिल्हा परिषदच्या वतीने तीर्थक्षेत्र वढा येथून उपक्रमाचा शुभारंभ केला.
चंद्रपुरातील गोंड राज्याची राजधानी झरपट नदीच्या काठावर उभी होती. किल्ल्याच्या प्राचीन परकोटाच्या बाहेर वाहणाऱ्या झरपट नदीच्या खोलीकरण आणि विस्तारीकरणाच्या कार्यक्रमाला महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी कुणाल खेमणार, महानगरपालिका आयुक्त संजय काकडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत व अन्य पदाधिकारी उपस्थितीत होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती पर्वावर आदरांजली अर्पण करून राष्ट्रव्यापी स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, केद्र्र सरकारने चार वर्षांत राबविलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे स्वच्छता अभियान लोकप्रिय ठरले आहे. जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात जागती निर्माण झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर देशातील लाखो कुटुंबांनी शौचालय बांधले. घरोघरी शौचालये बांधणे सोपे काम नव्हते.
सरकारने याकरिता मोठी मदत केली. यामध्ये महिला शक्तीचे प्रयत्न व योगदान कौतुकास्पद आहे. भारताच्या प्रतिमेला उजळ करणाºया या मोहिमेबद्दल प्रधानमंत्र्यांनी कौतुक केल्याचेही ना. अहीर यांनी सांगितले. झरपट नदीचे विस्तारीकरण व खोलीकरणाचा संकल्पही यावेळी जाहीर केला.