वातावरणातील बदलांमुळे अनेकांना सर्दी, खोकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:37 AM2021-06-16T04:37:32+5:302021-06-16T04:37:32+5:30
सध्या पावसाळा सुरू झाला असून मागील दोन ते तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे दमट वातावरण निर्माण झाले आहे. ...
सध्या पावसाळा सुरू झाला असून मागील दोन ते तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे दमट वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सध्या घट होत आहे. मात्र, दहशत कायम आहे. भीतीपेक्षा सतर्कता आणि खबरदारी महत्त्वाची असल्याने सौम्य स्वरूपातील लक्षणांकडे नागरिकांनी दुर्लक्ष न करता तपासणी करून संक्रमणाची शंका असल्यास डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.
ताप, खोकला, श्वास घेण्यास अडचण येत असलेल्यांनी प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. वैद्यकीय निरीक्षणानुसार अनेकजण सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखीसारखी लक्षणे लपवून आजार अंगावर काढतात किंवा परस्पर गोळ्या घेतात. असे न करता डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.