बंद असलेल्या नळयोजना सुरु कराव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:27 AM2020-12-22T04:27:17+5:302020-12-22T04:27:17+5:30

मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करा चंद्रपूर : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत ...

Close piping should be started | बंद असलेल्या नळयोजना सुरु कराव्या

बंद असलेल्या नळयोजना सुरु कराव्या

Next

मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करा

चंद्रपूर : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रात्री-बेरात्री हे कुत्रे अंगावर धाऊन येत असल्याने रात्रपाळीमध्ये कामाला जाणाºयांची मोठी फजिती होत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देवून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

घुग्घुस रो़डवर पोलिसांचा पहारा

चंद्रपूर : वणी-घुग्घुस या मार्गावर पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढविली आहे. विशेष म्हणजे, दिवस तसेच रात्रभर पोलीस रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुरक्षा कठडे लावून तपासणी करीत आहेत. नवीन वर्षाच्या तयारीसाठी काही जण वणी येथून दारू आणण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी अधिक लक्ष देणे सुरु केले आहे.

प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला

चंद्रपूर : राज्यात प्लास्टिक पिशवीवर बंदी घातली आहे. मात्र लॉकडाऊन काळात प्लास्टिकचा सर्रास वापर सुरू आहे. मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. बंदीनंतर सामान्य नागरिक प्लास्टिक पिशव्याचे दुष्पपरिणाम लक्षात घेता गाडीच्या डिक्कीत एखादी कापडी पिशवी घालून भाजीपाला आणत होते. अलीकडे कुठल्याही दुकानात कॅरीबॅग सहज मिळत आहे. प्लास्टिकमुळे विविध आजार पसरत असून त्याचे विघटन देखील होत नसल्याने प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

Web Title: Close piping should be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.