बंद नळयोजना सुरू कराव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:24 AM2021-01-04T04:24:53+5:302021-01-04T04:24:53+5:30
मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करावा चंद्रपूर : चंद्रपूर शहरासह परिसरातील गावांमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन ...
मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करावा
चंद्रपूर : चंद्रपूर शहरासह परिसरातील गावांमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रात्री-बेरात्री हे कुत्रे अंगावर धावतात. रात्रपाळीमध्ये कामाला जाणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
फांद्यांमुळे अपघाताची शक्यता
चंद्रपूर : शहरातील क्राईस्ट हाॅस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे असून या झाडांच्या फांद्या वाहनधारकांना जीवघेण्या ठरत आहेत. अनेकवेळा यामुळे अपघातही झाले आहे. त्यामुळे या फांड्या तोडून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे त्वरित फांद्या हटविण्याची मागणी केली जात आहे.
पुन्हा प्लास्टिक पिशव्यांचा वापर
चंद्रपूर : शहरात प्लास्टिकचा सर्रास वापर सुरू आहे. मात्र, कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. विशेषत: भाजीबाजारामध्ये काही व्यावसायिक ग्राहकांना या पिशव्या देत आहेत. त्यामुळे पथकाचे गठण करून संबंधितांना कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.