१२ वर्षांमध्ये ४७ हजार लॅन्डलाईन फोन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 10:34 PM2018-10-06T22:34:56+5:302018-10-06T22:35:21+5:30

जिल्ह्यात मागील १२ वर्षांत ४७ हजार लॅन्डलाईन फोन बंद झाले तर आर्थिक उत्पन्न ४० कोटीवरून २० कोटीवर आल्याची माहिती महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी दिली.

Closed 47 thousand landline phones in 12 years | १२ वर्षांमध्ये ४७ हजार लॅन्डलाईन फोन बंद

१२ वर्षांमध्ये ४७ हजार लॅन्डलाईन फोन बंद

googlenewsNext
ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या धोरणांचा परिणाम : जिल्ह्यातील ३२४ ग्रामपंचायतींना एनएएफएन सेवा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात मागील १२ वर्षांत ४७ हजार लॅन्डलाईन फोन बंद झाले तर आर्थिक उत्पन्न ४० कोटीवरून २० कोटीवर आल्याची माहिती महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी दिली.
भारत संचार निगम लिमिटेडची मोबाईल व लॅन्डलाईन सेवा संपूर्ण राज्यात तोट्यात आहे. पण, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात फायद्यात असल्याचेही त्यांनी नमूद केले. बीएसएनएल स्पर्धेत मागे पडण्यास केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत असल्याची बाबही संबंधित अधिकाऱ्यांनी मान्य केली. बीएसएनएल स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. त्यानिमित्ताने बीएसएनएलच्या नवीन उपक्रमाबद्दल महाप्रबंधक पाटील, उपमहाप्रबंधक आर.एम. कोजबे व मुख्य लेखा अधिकारी अनिल सहारे यांनी विविध पैलुंकडे लक्ष वेधले. २००६ मध्ये जिल्ह्यात बीएसएनएलचे सर्वाधिक ६० हजार लॅन्डलाईन फोन होते. परंतु, सध्या केवळ १३ हजार ६१८ लॅन्डलाईन फोन आहेत. जिल्ह्याचे २००६ मध्ये बीएसएनएलचे वार्षिक उत्पन्न ४० कोटी होते. आज केवळ २० कोटी आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी ते २६ ते २८ कोटी होते. बीएसएनएलचे राज्यात पाच हजार ९६२ ब्रॉडबॅन्ड कनेक्शन आहेत. १ लाख ५४ हजार १२७ मोबाईलधारक असून यामध्ये एक लाख ५० हजार ८७३ प्रिपेड तर तीन हजार २५४ पोस्टपेड मोबाईलधारक आहेत. बीएसएनएलची ३ जी सेवा चंद्रपूर, मूल, ब्रह्मपूरी, भद्रावती, वरोरा, बल्लारपूर व गडचांदूर येथे सुरू करण्यात आली. ही सेवा चिमूर, नागभीड, गोंडपिपरी, सिंदेवाही व राजुरा येथही सुरू लवकरच होणार आहे. नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्कने जिल्ह्यातील ३२४ ग्रा. पं. जोडल्या आहेत. उर्वरित ५०५ ग्रा. पं. ला जोडणी देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. एफटीटीएच सेवेसाठी चंद्रपूर जिल्हा राज्यात दुसºया क्रमांकावर आहे. प्रथम क्रमांकावर असणाºया पूणे जिल्ह्यात पाच हजार कनेक्शन तर जिल्ह्यात ६५० च्या सुमारे कनेक्शन आहेत. इतरत्र बीएसएनएल असअतानाच गडचिरोली जिल्ह्यात बीएसएनएल फायद्यात आहे, अशीही माहिती महाव्यवस्थापक पाटील यांनी दिली. गडचिरोलीत तीन लाख ४७ हजार बीएसएनएल मोबाईल ग्राहक आहेत. त्यांच्या पाठोपाठ चार हजार लॅन्ड लाईन तर १२०० ब्रॅन्डबँड कनेक्शन आहेत. महिन्याला एक कोटी ७५ लाखाचे उत्पन्न आहे.
नक्षलग्रस्त भागात वाढले ग्राहक
चंद्रपूर जिल्ह्यात बीएसएनएल ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे मागील १२ वर्षांच्या आकडेवारीवरून दिसून येते. परंतु नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात खासगी कंपन्यांऐवजी सर्वाधिक ग्राहक बीएसएनएलचे आहेत. मोबाईल फोन सेवा ठप्प करण्यासाठी नक्षलवादी हे टॉवर जाळपोळ करतात. मात्र, पोलीस बंदोबस्त वाढल्याने या घटनांना बराच आळा बसला. यातून बीएसएनएलचे नुकसानही कमी झाले. परंतु खासगी कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएल मागे पडल्याचे अधिकाºयांनी यावेळी मान्य केले.

Web Title: Closed 47 thousand landline phones in 12 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.