अपरिपक्वहापूस ग्राहकांच्या माथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:46 AM2019-04-14T00:46:53+5:302019-04-14T00:47:16+5:30
बाजारात फळांचे आगमन झाले. यंदा कर्नाटक आणि कोकणातून बऱ्याच प्रमाणात फळांची आयात होत आहे. मात्र अनेकांच्या आवडीचा अपरिपक्वकोवळा हापूस आंबा काही विक्रेत्यांनी ग्राहकांच्या माथी मारणे सुरू केल्याचे चंद्रपूर येथील बाजारपेठेत दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बाजारात फळांचे आगमन झाले. यंदा कर्नाटक आणि कोकणातून बऱ्याच प्रमाणात फळांची आयात होत आहे. मात्र अनेकांच्या आवडीचा अपरिपक्वकोवळा हापूस आंबा काही विक्रेत्यांनी ग्राहकांच्या माथी मारणे सुरू केल्याचे चंद्रपूर येथील बाजारपेठेत दिसून येत आहे.
मागील उन्हाळ्यात सात प्रकारची आंबे बाजारात विक्रीसाठी आली होती. वातावरण पोषण असल्याने आंब्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला नव्हता. मोठ्या व्यापाऱ्यांनी माफत दरात किरकोळ विक्रेत्यांना आंबे विकले. यामुळे आंब्यांच्या किंमतीत फारशी वाढ झाली नव्हती. गतवर्षी पहिल्या टप्प्यातच रत्नागिरी जिल्ह्यातून प्रसिध्द हापूस आंबा चंद्रपुरात विक्रीसाठी आला होता.
चार ते आठ डझन कच्च्या हापूस आंब्यासाठी एक हजार ५०० रुपये असा दर होता.
यावर्षीदेखील काही व्यापाºयांनी कोकण व कर्नाटकातून खास निर्यात करून आणल्याचे सांगून ग्राहकांना अपरिपक्वव कच्चा हापूस आंबा विकणे सुरू केले आहे. हापूस आंब्यावर काळसर ठिपके आहेत. शंकर सरोदे या ग्राहकाने दिलेल्या माहितीनुसार हापूस आंब्यावर असे ठिपके पडण्यासाठी थ्रिप्स व तुडतुडे कारणीभुत आहेत. यंदाचे हवामान या आंब्याला अनुकूल नाही. यामुळे विविध रोगांनी प्रादुर्भाव झालेला कच्चा हापूस आंबा ग्राहकांना विकणे सुरू झाले. यात ग्राहकांचे आरोग्य बाधित होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिध्द ंअसलेला हापूस आंबा विदर्भातील बाजापेठामध्ये उपलब्ध होईपर्यंत ग्राहकांची अशीच फसवणूक होण्याची शक्यताही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
असा ओळखावा हापूस
आंबा सोलताना सालीला गर लागत नाही.
गराचा रंग केशरी व गर्द असतो.
आंबा अत्यंत सुवासिक असतो.
अन्य आंब्याच्या तुलनेत हा आंबा आकाराने
लहान असतो.
या आंब्याचा गर पातळ असतो.