गुंडप्रवृत्तीवर प्रतिबंध घालण्यासाठी कोठारी बंद

By Admin | Published: June 14, 2014 11:27 PM2014-06-14T23:27:25+5:302014-06-14T23:27:25+5:30

येथील नितीन रमेश खाडीलकर या युवकावर गावातील काही गुंड प्रकृतीच्या तरुणांनी त्याच्याच उपहारगृहात पैसे देण्याचा वाद उपस्थित करुन जबर मारहाण केली. सदर प्रकरणी पोलिसांना तक्रार देण्यात आली.

Closet closure | गुंडप्रवृत्तीवर प्रतिबंध घालण्यासाठी कोठारी बंद

गुंडप्रवृत्तीवर प्रतिबंध घालण्यासाठी कोठारी बंद

googlenewsNext

कोठारी : येथील नितीन रमेश खाडीलकर या युवकावर गावातील काही गुंड प्रकृतीच्या तरुणांनी त्याच्याच उपहारगृहात पैसे देण्याचा वाद उपस्थित करुन जबर मारहाण केली. सदर प्रकरणी पोलिसांना तक्रार देण्यात आली. मात्र यावर योग्य कारवाई करण्यात आली नाही. उलट आरोपींना बचावात्मक कारवाई करण्यात आल्याने गावकऱ्यांत संतापाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी पोलीस प्रशासनाविरुद्ध व गुंड प्रवृतीच्या टोळक्यांवर कडक कारवाई करावी यासाठी कोठारी बंद ठेवून घटनेचा निषेध करण्यात आला.
कोठारी बस स्थानक परिसरात नितीन खाडीलकर यांचे कोल्ड्रीक्स व उपहार गृह आहे. ९ जून च्या रात्री ८ वाजताच्या दरम्यान अक्रम युनूस शेख याने आपल्या सहकार्यासह शितपेय घेतले. त्याची जूनी उधारी थकित होती. त्याची मागणी करताच त्याने नितीन खाडीलकर याला मारहाण केली. थोड्याचवेळात अक्रमचा भाऊ शारीफ व इरफान त्याठिकाणी येवून नितीनचे वडील रमेश व आई सुंदराबाई यांना सामूहिकपणे फायटर हत्याराने मारपिट केली. यात नितीन तसेच त्याच्या आईवडील जखमी झाले. याबाबतची तक्रार कोठारी पोलीस ठाण्यात करण्यात आली. रात्री तीन वाजता आरोपींना जामिनावर सोडण्यात आले. मारपीट करुन गावात दहशत पसरविणे तसेच गावात अवैध व्यवसाय करण्याचा या टोळक्यांचा व्यवसाय आहे. त्याच्या विरोधात बोलणाऱ्यास धमक्या देवून मारहाण करण्यात येते. अशा युवकांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. असे असताना पोलिसांनी त्यांना पाठिशी घालून बचाव केला. सदर प्रकरणाने संतापलेल्या कोठारीकरांनी शनिवारी कोठारीत कडकडीत बंद ठेवून मोर्चाचे आयोजन करण्यात आले. पोलीस प्रशासनाविरुद्ध नारेबाजी करण्यात आली. यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.
राजुरा उपविभागीय पोलीस अधिकारी राजरत्न बन्सोड, कोठारीचे ठाणेदार अरुण खुटेमाटे यांना निवेदन देवून प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी कोठारीचे व्यापारी, समाजसेवी संस्था, पक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली. यात शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष राजू दारी, मनसे तालुका प्रमुख विष्णू बुजोणे, शिवसेना तालुका प्रमुख आशिष देवतळे, शहर अध्यक्ष बाबा साहू, संजय खाडीलकर, मोरेश्वर लोहे, सुरेश तपासे किशोर कोटरंगे, सुरेश चहारे, शंकर भरारकर आदींनी निवेदन दिले.
तीन दिवसात पोलिसांनी ठोस कारवार्ई करुन आरोपींना जेरबंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी पोलिसांना दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: Closet closure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.