मूल येथील आगारासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी घातले लक्ष; आवश्यक कार्यवाही करण्याच्या दिल्या सूचना

By साईनाथ कुचनकार | Published: June 2, 2023 02:31 PM2023-06-02T14:31:12+5:302023-06-02T14:33:26+5:30

थेट मुख्यमंत्र्यांनी या आगाराबाबत लक्ष घातल्यामुळे येथील आगाराला प्रश्न लवकरच निकाली निघण्याची शक्यता

CM directly paid attention to bus depot at Mool; Instructions given to take necessary action | मूल येथील आगारासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी घातले लक्ष; आवश्यक कार्यवाही करण्याच्या दिल्या सूचना

मूल येथील आगारासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी घातले लक्ष; आवश्यक कार्यवाही करण्याच्या दिल्या सूचना

googlenewsNext

चंद्रपूर : जिल्ह्यातील मूल येथे राज्य परिवहन महामंडळाच्या स्वतंत्र आगार निर्मितीबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. थेट मुख्यमंत्र्यांनी या आगाराबाबत लक्ष घातल्यामुळे येथील आगाराला प्रश्न लवकरच निकाली निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात यासंदर्भात राज्य शासनाने सूचना केल्या होत्या. परिवहन विभागाने यातील सर्व बाबी तपासून कार्यवाही करावी, असे सांगितले. ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले की, मूल शहर वाढत आहे. त्यामुळे तेथे राज्य परिवहन महामंडळाच्या स्वतंत्र आगाराची आवश्यकता आहे. यासंदर्भात विधिमंडळ अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतली. परिवहन विभागाने तातडीने हा विषय मार्गी लावावा, असे त्यांनी सांगितले.

Web Title: CM directly paid attention to bus depot at Mool; Instructions given to take necessary action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.