जीएमआर व वर्धा पॉवर प्लांट कंपनीकडे जाणारी कोळसा वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:30 AM2021-07-27T04:30:08+5:302021-07-27T04:30:08+5:30

माढेळी : वरोरा एमआयडीसी क्षेत्रामधील जीएमआर आणि वर्धा पॉवर प्लांट या दोन कंपनीला एकोना खाणीतून कोळसा पुरविला जातो. त्यासाठी ...

Coal transport to GMR and Wardha Power Plant Company jammed | जीएमआर व वर्धा पॉवर प्लांट कंपनीकडे जाणारी कोळसा वाहतूक ठप्प

जीएमआर व वर्धा पॉवर प्लांट कंपनीकडे जाणारी कोळसा वाहतूक ठप्प

Next

माढेळी : वरोरा एमआयडीसी क्षेत्रामधील जीएमआर आणि वर्धा पॉवर प्लांट या दोन कंपनीला एकोना खाणीतून कोळसा पुरविला जातो. त्यासाठी वणोजा गावाजवळून कंपनीकडे जाण्यासाठी कच्चा रस्तादेखील तयार करण्यात आलेला आहे. मात्र पावसामुळे रस्ता पावसामुळे खराब झालेला आहे. वाहतूक चालू असताना सोमवारी सकाळी एक ट्रक रस्त्याच्या मधोमध फसला. त्यामुळे कंपनीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यापासून ते वनोजा गावापर्यंत आणि वानोजा गावापासून ते कंपनीकडे २ किलोमीटरपर्यंत ट्रकची रांगच रांग लागलेली होती. रोरा-माढेळी मार्गावर दिवसभर वाहनांना त्रास सहन करावा लागला. पावसाळ्याच्या दिवसांमुळे रस्त्यावर चिखल साचला आहे. अशावेळी अपघात होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. सकाळपासून सुरू झालेली ही वाहतूक कोंडी सायंकाळी ६ वाजतापर्यंत कायम होती.

260721\img_20210726_164646.jpg

वरोरा- मधेलि मार्गावर आज सकाळपासून अशी रंगाचं रांग पाहायला मिळाली.

Web Title: Coal transport to GMR and Wardha Power Plant Company jammed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.