कोळसा कामगारही जाणार संपावर
By admin | Published: June 12, 2017 12:37 AM2017-06-12T00:37:31+5:302017-06-12T00:37:31+5:30
केंद्र सरकार आणि कोल इंडियाच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ कोळसा कामगारांच्या संयुक्त संघर्ष समितीने
कामगार संमेलन : कोळसा खाण भविष्य निधीच्या विलयाला विरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र सरकार आणि कोल इंडियाच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ कोळसा कामगारांच्या संयुक्त संघर्ष समितीने १९ ते २१ जूनपर्यंत देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर दुर्गापूर येथील सभागृहात पाचही कामगार संघटनांचे संमेलन झाले.
या संपामध्ये बीएमएस, एचएमएस, आयटक, इंटक व सीटू या प्रमुख कामगार संघटना उतरल्या आहेत. केंद्र सरकारने कोळसा खाण भविष्य निर्वाह निधीचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला कामगारांचा कडाडून विरोध आहे. संमेलनामध्ये कोळसा खाण भविष्य निधी निवृत्ती वेतन योजना सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. वेतन समझोता -९ची पूर्ण अंमलबजावणी करा आणि समझोता-१० तातडीने लागू करण्यात यावा. कंत्राटदारी पद्धती कोळसा खाणीतून बंद करून कंत्राटी मजुरांना समान कार्य, समान वेतन देण्यात यावे, ओव्हर टाईम भत्त्यावरील निर्बंध हटविण्यात यावे. कोळसा खाणी बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा आदी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.