कोळसा खाणींमुळे घोंगावतेय जलसंकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:39 AM2019-04-08T00:39:35+5:302019-04-08T00:40:10+5:30
वेस्टर्न कोलफिल्ड लिमीटेडच्या कोळसा खाणीत दररोज पाण्याचा प्रचंड उपसा होत असल्याने कोळसा खाण परिसरातील गावागावात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. गावकऱ्यांची तहाण भागविणाऱ्या बोअरवेलही आटायला लागल्याने गोवरी परिसारातील गावागावात जलसंकट निर्माण झाले असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
प्रकाश काळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : वेस्टर्न कोलफिल्ड लिमीटेडच्या कोळसा खाणीत दररोज पाण्याचा प्रचंड उपसा होत असल्याने कोळसा खाण परिसरातील गावागावात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. गावकऱ्यांची तहाण भागविणाऱ्या बोअरवेलही आटायला लागल्याने गोवरी परिसारातील गावागावात जलसंकट निर्माण झाले असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
राजुरा तालुक्यात वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव, माथरा, अंतरगाव, चिंचोली, मानोली, बाबापूर परिसरात वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणींचे जाळे आहे. वेकोलिच्या कोळसा खाणी ३०० ते ४०० फुट खोल आहे. या कोळसा खाणीत दिवसरात्र पाण्याचा प्रचंड उपसा करण्यात येत असल्याने गोवरी परिसरातील व शिवारातील बोअरवेलला पाणी येत नाही. कोळसा खाणींनी पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाल्याने यंदा पाण्याची भिषण टंचाई होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. उन्हाळ्यापूर्वीच नदी, नाले, तलाव कोरडे पडल्याने पाण्याची पातळी खाली गेली आहे. गोवरी परिसरात मोठ्या प्रमाणात वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणींमुळे गावागावात जलसंकट घोंगवयाला सुरूवात झाली आहे. पाण्यासाठी जीव कासावीस होत असताना ४३ अंश सेल्सिअसच्या तापमानात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. वेकोलित होणाºया शक्तीशाली ब्लास्टिंगमुळे बहुतांश बोअरवेल खचल्याने अनेक बोअरवेलला पाणी येत नाही तर काही बोअरवेल व विहीरी नावापुरत्याच उरल्या आहेत.
शेतकऱ्यांनी सिंचनासाठी शेतात बोअरवेल खोदल्या. मात्र वेकोलिच्या शक्तीशाली स्फोटांनी बोअरवेल पूर्णत: खाली गेल्याने शेतकºयांना त्यांचा मोठाा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहै. पूर्वी वेकोलि परिसरातील गावात पाणी टचांई नव्हती. परंतू कोळसा खाणीे निर्माण झाल्यापासून पाण्याची पातळी अक्षरश: खाली गेल्याचे खाण परिसरातील गावातील प्रकल्पग्रस्त जाणकार नागरिक सांगतात. कोळस खाणींनी पाण्याची पातळी कमालीची घटल्याने गोवरी परिसरातील गावागावात भविष्यात भीषण पाणी टंचाई होण्याची शक्यता आहे.
वेकोलिचे दुष्परिणाम गावकऱ्यांच्या माथी
वेकोलिच्या कोळसा खाणी निर्माण झााल्यापासून प्रकल्पग्रस्त गावातील नागरिकांना वेकोलिचे दुष्परिणाम सहन करावे लागत आहे. मात्र प्रशासनाने आजपर्यंत गावकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही, हे येथील नागरिकांचे दुर्दैव आहे.