जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:12 AM2017-12-05T00:12:22+5:302017-12-05T00:12:34+5:30

चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मागील चार-पाच दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे.

The cold wave in the district increased | जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला

जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला

Next
ठळक मुद्देचंद्रपूर @१४.६ : ब्रह्मपुरीत पारा १०.९ अंशावर घसरला

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मागील चार-पाच दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. अंगात हुडहुडी भरू लागल्याने ग्रामीण भागात शेकोट्या पेटविणे सुरू झाले आहे. चंद्रपुरात सोमवारी १४.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली, तर ब्रह्मपुरीत पारा १०.९ अंशापर्यंत घसरला आहे.
चंद्रपूर जिल्हा तसा तप्त उन्हाळ्यामुळे राज्यभर प्रसिध्द आहे. उन्हाळ्यात बाहेर जिल्ह्यातील नागरिक चंद्रपुरात यायला घाबरतात, एवढी उन्हाची दाहकता असते. यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळा चांगलाच तापला. सूर्याचा पारा ४८ अंशापार गेला होता. मात्र त्यानंतर पावसाळ्याने ऋतुचक्राला बगल दिली. प्रारंभी दमदार आलेला पाऊस पुढे कुठे गायब झाला, कळले नाही. पावसाने जिल्ह्यात सरासरीही गाठली नाही. अत्यल्प पावसामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. अनेकांची पिके डोळ्यादेखत सुकली. नंतर परतीच्या पावसाने कहर केला. यातही शेतकºयांचेच नुकसान झाले.
यंदा पावसाळ्याने शेतकºयांना दगा दिला. त्यामुळे खरीप हंगाम हातून गेला. उत्पादन निम्म्यावर आले. आता हिवाळ्यात चांगली थंडी राहिली तर रबी हंगामात तरी नुकसान भरून निघेल, अशी आशा शेतकºयांना आहे. एरवी दिवाळीपासून थंडीला सुरूवात होते. मात्र यावेळी दिवाळी आॅक्टोबर महिन्यातच आल्यामुळे थंडी जाणवली नाही. उलट उन्ह तापत असल्याने अनेकांनी घरातील कुलर काढलेच नाही. नोव्हेंबर महिन्यातही थंडीचा फारसा जोर नव्हता. दुपारचा उकाडा कायम होता. नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात थोडीफार गुलाबी थंडी जाणवू लागली. मात्र आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच थंडीचा अचानक जोर वाढला आहे. मागील चार-पाच दिवसांपासून तर पारा चांगलाच खाली आला आहे. पहाटे आणि रात्रीच्या सुमारास कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. दिवसभरही वातावरणात गारवा राहत असल्याने नागरिक उन्हात उभे राहताना दिसत आहे. सोमवारी चंद्रपुरात १४.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उद्योगांमुळे चंद्रपुरात पारा जरा अधिक आहे. मात्र ग्रामीण भागात कडाक्याची थंडी पडू लागली आहे. ब्रह्मपुरीत सोमवारी १०.९ अंश सेल्सियसपर्यंत पारा घसरला. ग्रामीण भागातील चौकाचौकात शेकोट्या पेटवून नागरिक थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

उणीवस्त्रांची मागणी वाढली
अचानक थंडीचा जोर वाढल्याने तिबेटीयन लोकांनीही उणीवस्त्रांची बाजारपेठ सज्ज केली आहे. जयंत टॉकीज चौकात स्वतंत्र बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत मागील दोन-तीन दिवसांपासून नागरिकांची गर्दी वाढत आहे. याशिवाय शहरातील अनेक दुकानातही ग्राहकांची उणीवस्त्रांसाठी गर्दी होताना दिसून येत आहे.

Web Title: The cold wave in the district increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.