संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यत्वाचा शिवसेनेकडून सामूहिक त्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:25 AM2021-02-15T04:25:11+5:302021-02-15T04:25:11+5:30
महाविकास आघाडीच्या ठरलेल्या फार्मुल्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात ज्या पक्षाचा पालकमंत्री असेल त्या पक्षाला ६० टक्के अध्यक्षपद आणि उर्वरित ४० टक्केमध्ये ...
महाविकास आघाडीच्या ठरलेल्या फार्मुल्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात ज्या पक्षाचा पालकमंत्री असेल त्या पक्षाला ६० टक्के अध्यक्षपद आणि उर्वरित ४० टक्केमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी २० टक्के अध्यक्षपद असे ठरले आहे. असे असताना चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वाट्याला संजय गांधी निराधार योजनेचे एकही अध्यक्षपद मिळाले नाही, हे कारण पुढे करीत शिवसेनेच्या चंद्रपूर तालुक्यातील संतोष नरुले व राजू डोमकावळे, बल्लारपूर तालुक्यातील प्रभाकर मुरकुटे व युसूफ शेख, पोंभूर्णा तालुक्यातील रवींद्र ठेंगणे व दत्तू मोरे, मूल तालुक्यातील नितीन बेरोजवार व सत्यनारायण अमरुद्दीवार जिवती तालुक्यातील पंढरी मस्कले व रमेश राठोड, कोरपना तालुक्यातील अंकुश वांढरे व अब्दुल अब्दुलगणी, गोंडपिपरी तालुक्यातील नितीन धानोरकर व कुशाब सिडाम, राजुरा तालुक्यातील राजेंद्र डोहे व वासुदेव चाफले यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदाचे सामूिहक राजीनामे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे पाठविले.