काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
By admin | Published: June 23, 2017 12:31 AM2017-06-23T00:31:28+5:302017-06-23T00:31:28+5:30
येथील पालिकेच्या स्वीकृत सदस्याच्या निवडणुकीचे सोपस्कार आटोपताच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्यांचे सत्र आरंभले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : येथील पालिकेच्या स्वीकृत सदस्याच्या निवडणुकीचे सोपस्कार आटोपताच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्यांचे सत्र आरंभले आहे. येथील पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे थेट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षाना पाठविले आहेत. या प्रकाराने काँग्रेस वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.
जिल्हा काँग्रेस कमेटीचे महासचिव प्रा. डॉ. अमिर धम्माणी, जिल्हा सचिव प्रमोद चौधरी, तालुका काँग्रेस कमेटीचे सचिव प्रा. डॉ. मोहण जगनाडे, सहसचिव प्रा. रमेश जिभकाटे, माजी सरपंच डॉ. रविंद्र कावळे, किसान सेलचे तालुकाध्यक्ष आनंद भरडकर, माजी सरपंच किशोर समर्थ, प्रा. डॉ. रेखा जगनाडे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. पालिका निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होण्याला स्थानिक नेतृत्व जबाबदार असून नियोजन न करणे व कार्यकर्त्यांना विश्वासात न घेणे, असे आरोप पत्रात केले आहेत.