कोल ब्लाॅक प्रकरणात जिल्हाधिकारी पोहोचले टाकळी गावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:30 AM2021-09-26T04:30:31+5:302021-09-26T04:30:31+5:30

भद्रावती : तालुक्यातील मौजा टाकळी-बेलोरा-जेना येथे अरबिंडो कंपनीने गावकऱ्यांशी केलेली फसगत करून सर्वेक्षणामार्फत स्वाक्षरी केल्याचा प्रकार केल्याने अरबिंडो कंपनीचा ...

Collector arrives in Takli village in Coal Black case | कोल ब्लाॅक प्रकरणात जिल्हाधिकारी पोहोचले टाकळी गावात

कोल ब्लाॅक प्रकरणात जिल्हाधिकारी पोहोचले टाकळी गावात

भद्रावती : तालुक्यातील मौजा टाकळी-बेलोरा-जेना येथे अरबिंडो कंपनीने गावकऱ्यांशी केलेली फसगत करून सर्वेक्षणामार्फत स्वाक्षरी केल्याचा प्रकार केल्याने अरबिंडो कंपनीचा प्रकल्प येथे नकोच असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. हे प्रकरण बघता जिल्हाधिकाऱ्यांनी टाकळी येथे गावकऱ्यांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधून गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच गावकऱ्यांनीसुद्धा आपल्या समस्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.

अरबिंडो कंपनीला कोल ब्लॉक मिळाल्याने ही कंपनी चालू करण्यासाठी हालचाली चालू आहे. तसेच येथील सरपंच, उपसरपंच यांना विश्वासात घेऊन त्यांच्या लेटरपॅडच्या परवानगीने कंपनी गावातील नागरिकांना कोणतीही माहिती न देता भूसंपादनबाबात संपूर्ण अटी मान्य असल्याबाबतचे पत्र इंग्रजीमध्ये देऊन सर्वेक्षणाच्या माध्यमातून स्वाक्षऱ्या घेण्याचा प्रकार करून गावकऱ्यांची फसगत करण्यात येत होती. हा प्रकार बघता भाजप जिल्हा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे यांनी या प्रकाराची भद्रावती पोलीस, तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी यांना तक्रार केली. याबाबत तहसीलदार यांनीसुद्धा आपल्या कार्यालयात गावकऱ्यांसमक्ष अरबिंडो कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असता ते याबाबत उत्तर देण्यास असमर्थ ठरले.

गावकऱ्याचा अरबिंडो कंपनीविरोधात रोष बघता जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी पीक सर्वेक्षणाच्या बाबत माहिती घेत असताना टाकळी गावाला भेट दिली. गावकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात जमिनीची किंमत, गावाचे पुनर्वसन पॉलिसी, रोजगाराचा प्रश्न हे प्रमुख तीन प्रश्न निकाली काढावे, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा अरबिंडो कंपनीने केलेले सर्वेक्षण चुकीचे असल्याचे सांगितले तसेच येतील तीनही गावकऱ्यांच्या ग्रामसभेत झालेल्या निर्णयानुसार कंपनीला अनुमती देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

250921\img_20210925_173229.jpg

टाकळी येथे जिल्हाधिकार्‍यांनी साधना गावकऱ्यांशी संवाद

Web Title: Collector arrives in Takli village in Coal Black case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.