पूरपरिस्थिती उपाययोजनेसाठी जिल्हाधिकारी ‘ऑनफिल्ड’, विविध गावांची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 02:53 PM2023-07-12T14:53:52+5:302023-07-12T14:56:38+5:30

आम्ही जगायचे कसे? ग्रामस्थांनी उपस्थित केला प्रश्न

Collector 'onfield', inspection of various villages for flood relief measures | पूरपरिस्थिती उपाययोजनेसाठी जिल्हाधिकारी ‘ऑनफिल्ड’, विविध गावांची पाहणी

पूरपरिस्थिती उपाययोजनेसाठी जिल्हाधिकारी ‘ऑनफिल्ड’, विविध गावांची पाहणी

googlenewsNext

चंद्रपूर : मागील वर्षी भद्रावती व चंद्रपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये आलेल्या पुरामुळे नागरिकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावर्षी हे नुकसान टाळण्यासाठी तसेच संभाव्य पूर परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनेसाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी ‘ऑनफिल्ड’ जाऊन प्रत्यक्ष गावांना भेटी दिल्या व नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान, वेकोलीच्या ओव्हर बर्डनमुळे नदी – नाल्यांचे पाणी गावात येत असून घर, शेती, अन्न, खते, घरातील इतर वस्तूंची मोठ्या प्रमाणात नासाडी होते. त्यामुळे आम्ही जगायचे कसे ते तुम्ही सांगा, असा प्रश्न नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे उपस्थित केला.

जिल्हाधिकाऱ्यांनी भद्रावती तालुक्यातील पळसगाव, माजरी, चारगाव, पिपरी व चंद्रपूर तालुक्यातील बेलसनी येथे भेट दिली. यावेळी सहायक जिल्हाधिकारी मरुगानंथम एम., जिल्हा खणिकर्म अधिकारी सुरेश नैताम, वरोराच्या उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे, भद्रावतीचे तहसीलदार अनिकेत सोनवणे, गटविकास अधिकारी मंगेश आरेवार, वेकोली (माजरी क्षेत्राचे) चे महाव्यवस्थापक इलियाज हुसैन आदी उपस्थित होते. पळसगाव येथे नागरिकांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, गतवर्षी या भागात आलेल्या भयंकर पुराची स्थिती टाळण्यासाठी यावर्षी आवश्यक उपाययोजना करण्यात येईल. पाहणीदरम्यान पळसगावचे सरंपच अंकुश मेश्राम, चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, बेलसनीच्या सरपंच इंदिरा पोले यांच्यासह पूरपीडित गावांचे नागरिक उपस्थित होते.

या सुचविल्या उपाययोजना

वेकोलीच्या ओव्हर बर्डनमुळे संभाव्य पूर परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे शास्त्रीय नियमानुसार नदीच्या पात्रापासून ठरावीक अंतरावर वेकोलीने डंपिंग करावे. नियमितपणे डंपिंग मोकळे करून नदीचा प्रवाह वाहता करावा. पुराच्या पाण्यामुळे गावातील रस्ते सुस्थितीत करून अखंडित वीज पुरवठा होण्यासाठी त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. गावात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्वरित करावी. वेकोलीने महिन्याअखेरपर्यंत आरओ लावावे. वेकोलीने सांडपाण्याबाबतचा अहवाल त्वरित सादर करावा. पूर परिस्थितीमध्ये नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी गावात एक सुरक्षित निवारास्थान करण्याचे नियोजन आहे.

Web Title: Collector 'onfield', inspection of various villages for flood relief measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.