जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक केली धान खरेदीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:15 AM2020-12-28T04:15:27+5:302020-12-28T04:15:27+5:30
चंद्रपूर : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी ब्रम्हपुरी व चौगान येथील बाजार समितीला आकस्मिक भेट देवून धान खरेदी ...
चंद्रपूर : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी ब्रम्हपुरी व चौगान येथील बाजार समितीला आकस्मिक भेट देवून धान खरेदी नियमानुसार सुरू आहे का, याची पाहणी केली.
यावेळी त्यांनी धानाची ग्रेडीग व्यवस्थित करून शेतकºयांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्याचे तसेच परराज्यातील व व्यापाºयांकडील धान स्थानिक बाजार समितीत खरेदी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी यावेळी बाजार समितीत धानविक्रीसाठी जमलेल्या शेतकºयांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, नायब तहसीलदार योगेश शिंदे, मंडळ अधिकारी बोदे, संबंधित सहाय्यक निबंधक, तलाठी, बाजार समितीचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील धान उत्पादक शेतकºयांना हमीभावावर रुपये सातशे रुपये बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे परराज्यातील धान महाराष्ट्रात विक्री करून शासनाची फसवणूक करणाºयांवर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मागील महिन्यात तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील नुकतेच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचेही निर्देश दिले होते.