कॉलेज बंद आंदोलन

By admin | Published: October 6, 2015 01:10 AM2015-10-06T01:10:23+5:302015-10-06T01:10:23+5:30

पुणे येथील एफटीआय आंदोलनास तीन महिने लोटूनसुद्धा सरकारला जाग आली नाही. एफटीआयमधील गजेंद्र चव्हाण

College closed movement | कॉलेज बंद आंदोलन

कॉलेज बंद आंदोलन

Next

गडचांदूर: पुणे येथील एफटीआय आंदोलनास तीन महिने लोटूनसुद्धा सरकारला जाग आली नाही. एफटीआयमधील गजेंद्र चव्हाण यांची नियुक्ती रद्द करा, या मागणीसाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी या आंदोलनास पाठींबा दिला आहे. त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ राजुरा विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने विधानसभा क्षेत्रातील सर्व कॉलेज सोमवारी बंद ठेवण्यात आले.
सर्व पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात आपापल्या क्षेत्रातील कॉलेज बंद ठेवण्याच्या सूचना प्रदेश युवक काँग्रेस कडून प्राप्त झाल्या होत्या. बंद १०० टक्के यशस्वी झाला असून राजुरा, गोंडपिपरी, जिवती व कोरपना येथील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रात बंद यशस्वी केला.
माजी आमदार तथा काँग्रेसचे नेते सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनात राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष देरकर यांच्या नेतृत्वात राजुरा तालुक्यात युवक काँग्रेसचे एजाज अहेमद, चेतन जयपूरकर, आशिष यमनुरवार, शहानवाज कुरेशी, मंगेश गुरनुले, योगेश मडावी, मंगेश मडावी, आसिफ सय्यद, तर कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथे सतिश बेतावार, विक्रम येरणे, प्रविण झाडे, रोहित शिंगाडे, प्रितम सातपुते, रुपेश चुधरी, नांदाफाटा येथे अभय मुनोत, हारुन सिद्दीकी, , कोरपना येथे गणेश गोडे, नितीन बावणे, मसुद शेख, गोंडपिपरी येथे राजीवसिंग चंदेल, जिवती तालुक्यात अश्पाक शेख इत्यादी कार्यकर्त्यांनी आपापल्या तालुक्यात बंद यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: College closed movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.