मास्क असेल तरच महाविद्यालयात एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:44 AM2021-02-23T04:44:25+5:302021-02-23T04:44:25+5:30
कोरोनामुळे २२ मार्च २०२० पासून शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली. २८ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर ...
कोरोनामुळे २२ मार्च २०२० पासून शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली. २८ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्यात आली. त्यापूर्वी ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली होती. चंद्रपूर शहरात अनेक नामांकित महाविद्यालये आहेत. येथे जिल्ह्याबाहेरील युवकही शिक्षणासाठी येतात. समाजकल्याण विभागाच्या मुला व मुलींसाठी वसतिगृह आहेत. परंतु, त्या वसतिगृहात कोरोना विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे वसतिगृह बंद आहेत. परिणामी बाहेरील विद्यार्थ्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी शहरात आलेच नाही. तर आता पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढायला लागली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पाठविण्यास आई-वडिलही आढेवेढे घेत आहेत, तर विद्यार्थीही अनुत्साही दिसून येत आहेत. त्यामुळे महाविद्यालये पूर्वीप्रमाणे गजबजलेली दिसून येत नाही.
बॉक्स
सॅनिटायझर व मास्क अनिवार्य
शासनाने ५० टक्के तत्त्वावर महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी दिल्याने जिल्ह्यातील ११४ महाविद्यालये सुरू झाली आहेत. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येताना मास्क व सॅनिटायझर अनिवार्य करण्यात आले आहे. बहुतांश महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी सॅनिटायझर मशीन बसविली आहे. विना मास्क विद्यार्थ्यांना प्रवेश नसल्याचे प्राचार्यांनी सांगितले आहे.
बॉक्स
५० टक्के तत्त्वावर महाविद्यालये सुरू झाली आहेत. परंतु, २५ टक्केच विद्यार्थी महाविद्यालयात येत आहेत. विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात सॅनिटायझर उपलब्ध करून दिले असून, थर्मल तपासणी करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे.
डॉ. अशोक जिवतोडे, जनता कॉलेज, चंद्रपूर
कोट
सुमारे ११ महिन्यानंतर महाविद्यालये सुरू झाली. मित्रांच्या भेटीगाठी झाल्या. सोशल डिस्टन्सिंगनुसार बैठक व्यवस्था आहे. परंतु, कोरोनाने मनावर दडपण असल्याचा भास होत असतो. पूर्वीसारखे मोकळे वाटत नाही.
- मृणाल गोलकोंडावार, महाविद्यालयीन विद्यार्थी,
--------
महाविद्यालय सुरू होण्याची घोषणा आनंददायी होती. काही महिने ऑनलाईन शिक्षण घेतल्यानंतर आता काही अटींवर प्रत्यक्ष शिक्षणाला सुरुवात झाली आहे. प्राध्यापक व मित्रांशी भेटण्याची पुन्हा संधी मिळाली. हसतखेळत शिक्षणाला पुन्हा सुरुवात झाली आहे.
- धम्मदीप बोरकर, महाविद्यालयीन विद्यार्थी.
------
जिल्ह्यातील एकूण महाविद्यालये ११४
सुरू झालेली महाविद्यालये ११४
विद्यार्थ्यांची उपस्थिती