गावाच्या स्वच्छतेसाठी सरसावले महाविद्यालयीन युवक

By admin | Published: January 21, 2017 12:42 AM2017-01-21T00:42:59+5:302017-01-21T00:42:59+5:30

गाव हा विश्वाचा नकाशा आहे. गाव स्वच्छ झाला, पर्यायाने देश स्वच्छ होण्यास मदत होते.

College youths who have come to clean the village | गावाच्या स्वच्छतेसाठी सरसावले महाविद्यालयीन युवक

गावाच्या स्वच्छतेसाठी सरसावले महाविद्यालयीन युवक

Next

स्वच्छतेसाठी एकवटली युवाशक्ती : गोवरी येथे श्रमसंस्कार शिबिर
गोवरी : गाव हा विश्वाचा नकाशा आहे. गाव स्वच्छ झाला, पर्यायाने देश स्वच्छ होण्यास मदत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा मुलमंत्र देत स्वच्छता मिशन राबविले. याच स्वच्छता मिशनचा वसा घेत शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा श्रमसंस्कार शिबिरातील महाविद्यालयीन युवकांनी चक्क हातात झाडू घेऊन गावाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकीचा परिचय करून दिला.
शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुराच्या वतीने गोवरी येथील शिवाजी हायस्कुल येथे पाच दिवसीय श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. ‘अस्वच्छतेमुळे होणारे दुष्परिणाम आणि त्यांचे आरोग्यावर होणारे विपरित परिणाम’ गावकऱ्यांना पटवून दिले. व्हॉट्सअप, फेसबुकच्या जगात गावाच्या स्वच्छतेसाठी एकवटलेली महाविद्यालयीन तरुणाई पाहून अनेकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी चक्क स्वत: हातात झाडू घेऊन गावाची स्वच्छता केली. सामाजिक बांधीलकीच्या माध्यमातून गावासाठी राबविलेला उपक्रम कौतुकाचा विषय ठरला आहे. शिबिरात १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग आहे. रासेयो अधिकारी प्रा.संजय काटेवार व कार्यक्रम अधिकारी प्रा. दुधे यांच्या मार्गदर्शनात शिबिर सुरू आहे. (वार्ताहर)

विद्यार्थ्यांनी दिला
स्वच्छतेचा संदेश
श्रमसंस्कार शिबिरात आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गावाची स्वच्छता करून गावकऱ्यांना स्वच्छ गाव सुंदर गावांचा संदेश दिला आहे. यातून विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधीलकी जोपासली आहे.

Web Title: College youths who have come to clean the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.