कलर्स आणि लोकमत तर्फे आयोजित बेपनाह सुरांच्या मैफिलीत सखी झाल्या धुंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 11:46 PM2018-03-21T23:46:31+5:302018-03-21T23:46:31+5:30
आजची स्त्री स्मार्ट स्त्री समजली जाते. एकाचवेळी तिला घर, संसार, मुलांच्या शाळा, अभ्यास, घरातील ज्येष्ठांचे आजारपण, पैपाहुणे, नोकरी, व्यवसाय यात तिचा दिवस कसा सरतो, तिचे तिलाच समजत नाही.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : आजची स्त्री स्मार्ट स्त्री समजली जाते. एकाचवेळी तिला घर, संसार, मुलांच्या शाळा, अभ्यास, घरातील ज्येष्ठांचे आजारपण, पैपाहुणे, नोकरी, व्यवसाय यात तिचा दिवस कसा सरतो, तिचे तिलाच समजत नाही. अशा तिच्या धावपळीच्या जीवनात थोडा विसावा, मनोरंजनाची संधी द्यावी, मराठी नववर्ष अर्थात पाडवा साजरा केल्यानंतर भारतीय कलेंचे अविभाज्य अंग असलेल्या संगीताच्या कार्यक्रमाचा तिला आस्वाद घेता यावा, या उद्देशाने लोकमत सखी मंच व कलर्स वाहिनी यांच्या वतीने सोमवारी येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित ‘बेपनाह सुरांची मैफिल’ कार्यक्रमात सखी धुंद झाल्या. एकाहून एक सरस गितांची श्रृंखला सखींना मंत्रमुग्ध करून गेली.
सर्वप्रथम स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेंद्र कोरे, आनंद नागरी बँकेचे संचालक जितेंद्र चोरडीया, लोकमत परिवारातील सदस्य रमण बोथरा, बंटी चोरडिया, शाखा व्यवस्थापक विनोद बुले, जिल्हा प्रतिनिधी राजेश भोजेकर उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रारंभ गणेश वंदनेने झाली. यावेळी सुप्रसिद्ध गायक मुकेशकुमार, निकिता गोवर्धन, जित बिश्वास, तृप्ती गटलेवार यांनी विविध बाहरदार गाणे सादर केले. ‘तुही ये मुझ को बता दे...’, ‘फिर मोहब्बत करने चला आया तू...’, ‘भिगी भिगी रातो में....’, ‘एक अजनबी हसीना से...’, ‘निले निले अंबर पे....’, ‘मेरे रश्के कमर...’ आदी गाणे झाले. यावेळी सखींसाठी वन मिनीट गेम शो घेण्यात आला. त्यामध्ये सखी उत्साहाने सहभागी झाल्या. संचालन मकसूद खान, जिल्हा इव्हेंट प्रमुख अमोल कडूकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन लोकमत सखी मंच जिल्हा संयोजिका सोनम मडावी यांनी केले.
‘बेपनाह’ ही कथा प्रेम आणि विश्वासघात यावर आधारित आहे. ज्यात जोया आणि आदित्य या दोघांचे आयुष्य एका घटनेने पूर्णत: बदलून जाते. यात एका रात्री जोयाचा पती आणि आदित्यच्या पत्नीचा एका कार अपघातात मृत्यू होतो. अपघाताच्या वेळी दोघेही एकत्र असल्याचे समजल्यानंतर जोया आणि आदित्यच्या दु:खाची जागा विश्वासघात आणि द्वेषाने घेतली जाते. आपल्या पतीने विश्वासघात केला, हे मानण्यास जोया तयार नव्हती. आदित्यने त्याच्या पत्नीला विश्वासघातकी मानून तिच्याशी जुळलेल्या प्रत्येक गोष्टीचा द्वेष करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे जोया आणि आदित्य एकत्र येतात आणि यापुढे काय घडते, हे जाणून घेण्यासाठी पहा ‘बेपनाह- एक हादसा दो अजनबी’. जोया आणि आदित्यची कहाणी १९ मार्चपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता फक्त कलर्सवर.