आॅटोचालकांचा संमिश्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 10:08 PM2019-07-02T22:08:07+5:302019-07-02T22:08:22+5:30
पोलीस उपनिरीक्षकाने आॅटोचालकाला विनाकारण मारहाण केल्याच्या निषेधार्थ आॅटो चालक-मालक संघटनेच्या नेतृत्वात मंगळवारी शहरात बंद पाळण्यात आला. बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. एकदिवसीय बंदमुळे काही ठिकाणी नागरिकांची गैरसोय झाली. मारहाण करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाविरूद्ध कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे शिष्टमंडळाने निवेदनातून केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पोलीस उपनिरीक्षकाने आॅटोचालकाला विनाकारण मारहाण केल्याच्या निषेधार्थ आॅटो चालक-मालक संघटनेच्या नेतृत्वात मंगळवारी शहरात बंद पाळण्यात आला. बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. एकदिवसीय बंदमुळे काही ठिकाणी नागरिकांची गैरसोय झाली. मारहाण करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाविरूद्ध कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे शिष्टमंडळाने निवेदनातून केली.
३० जून रोजी आॅटोचालक अशोक कुंड हे महात्मा गांधी चौकात नो पार्किंगमध्ये प्रवाशांच्या प्रतीक्षेत उभे होते. यावेळी पोलीस निरीक्षकाने चालान फाडून कलम २८३ अन्वये कारवाई करण्यास कुणाचा आक्षेप नव्हता. परंतु, ठाण्यात बंद करून कुंड यांना बेदम मारहाण केली. कायद्याचे रक्षण करणारेच कायदा हातात घेऊन अन्याय केल्याचा आरोप आप आॅटो चालक-मालक संघटनेने केला. या घटनेचा निषेध म्हणून मंगळवारी शहरातील सर्व आॅटो बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. परिणामी, महाराष्ट्र आॅटो संघटना, भीमशक्ती आॅटो संघटना व अन्य संघटनांच्या पदाधिकारी सभा घेऊन आज शहरात कडकडीत बंद पाळला. पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. आॅटो संघटनेचे अध्यक्ष शंकर धुमाळे, शहरध्यक्ष शेख अमजद, बलराम शिंदे, बंडू भगत, पुरूषोत्तम किल्लारे, शाबास पठाण, अशोक कुंडू, मारोती धकाते, खलील शेख, रियाज शेख, शहिद शेख, बंडू पेंदाम, मुजफर शेख, सुनील मूसळे, भिवराज सोनी, संतोष दोरखंडे, योगेश आपटे, संदीप पिंपळकरे आदींची उपस्थिती होती.