बचत गटांमार्फत उद्योग विकासासाठी पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 10:41 PM2019-02-09T22:41:18+5:302019-02-09T22:41:37+5:30

राज्य शासनाकडून महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी हिरकणी योजनेची सुरूवात करण्यात आली. योजनेअंतर्गत तालुक्यातील अभिनव प्रयोग करणाऱ्या १० बचत गटांची निवड होणार आहे.

Come forward to the development of industry by saving groups | बचत गटांमार्फत उद्योग विकासासाठी पुढे यावे

बचत गटांमार्फत उद्योग विकासासाठी पुढे यावे

Next
ठळक मुद्देसुरेश प्रभू : व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य शासनाकडून महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी हिरकणी योजनेची सुरूवात करण्यात आली. योजनेअंतर्गत तालुक्यातील अभिनव प्रयोग करणाऱ्या १० बचत गटांची निवड होणार आहे. बचत गटांना आर्थिक मदत देण्यात येणार असून महिलांनी उद्योग विकासासाठी पुढे यावे, अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. शनिवारी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना बोलत होते.
मंत्रालयातील वार रूममध्ये यावेळी राज्याचे कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, कौशल विकास राज्यमंत्री रणजित पाटील, संबंधित विभागाचे सचिव असिम गुप्ता, महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर उपस्थित होते. चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर यांनी ना. प्रभू यांच्याशी संवाद साधला. उद्योजकता निर्माण करण्यासाठी हिरकणी योजना १७ फेब्रुवारीपासून तालुकास्तरीय आयोजनाला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील सक्षम बचत गटांना केंद्र्र पातळीवर काम करण्याची संधी दिली जाईल, अशी ग्वाही ना. प्रभू यांनी दिली.
महिला बचत गटांसाठी ही एक नवीन संधी असून जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे महिला बचत गटांचे कार्य चालू असल्याचे महापौर घोटेकर यांनी सांगितले. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरकणी योजनेमध्ये जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत गटांचा सहभाग नोंदविण्याबाबत यापूर्वी जाहीर केल्याचेही त्यांनी सांगितले. यानुसार जिल्ह्यामध्ये काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बचतगट अतिशय सक्षमतेने काम करत असताना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी, यासाठी ना. प्रभू तसेच राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही घोटेकर यांनी केले. अधिकाºयांनी जिल्ह्यातील माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्र्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी जी. आर. वायाळ, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी भैय्यासाहेब येरमे आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

Web Title: Come forward to the development of industry by saving groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.