चला, सोमनाथच्या आंतरभारती-भारत जोडो श्रमसंस्कार छावणीत; डॉ. विकास आमटे यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 06:16 PM2022-03-31T18:16:57+5:302022-03-31T18:17:59+5:30

Chandrapur News स्व. बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील सोमनाथ प्रकल्पात आंतरभारती - भारत जोडो - श्रमसंस्कार छावणीचे आयोजन १५ ते २२ मे या कालावधीत करण्यात आले आहे.

Come on, to Somnath's camp; Appeal by Dr. Vikas Amte | चला, सोमनाथच्या आंतरभारती-भारत जोडो श्रमसंस्कार छावणीत; डॉ. विकास आमटे यांचे आवाहन

चला, सोमनाथच्या आंतरभारती-भारत जोडो श्रमसंस्कार छावणीत; डॉ. विकास आमटे यांचे आवाहन

googlenewsNext

चंद्रपूर : स्व. बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील सोमनाथ प्रकल्पात आंतरभारती - भारत जोडो - श्रमसंस्कार छावणीचे आयोजन १५ ते २२ मे या कालावधीत करण्यात आले आहे. श्रमाला प्रतिष्ठा देणे तथा श्रमसंस्कार यासोबतच सामाजिक बांधिलकीसह मानवी मूल्ये जपणारे संस्कार देणे हे महत्त्वपूर्ण कार्य या छावणीच्या माध्यमातून केले जाते.

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथून सुमारे १३ कि.मी. अंतरावरील निसर्गरम्य सोमनाथ येथे स्वर्गीय बाबा आमटे यांनी श्रमसंस्काराची चळवळ १९६८ पासून सुरू केली. कोरोना प्रादुर्भावाचा दोन वर्षे अपवाद वगळता ती अविरतपणे सुरूच आहे. आजवर या छावणीत सामान्य माणसांपासून ते दिग्गजांपर्यंत लाखो लोकांनी हजेरी लावली आहे. या छावणीतून राज्यातीलच नव्हे, तर देशातील अनेकांनी आपला सहभाग नोंदविला आहे. या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महारोगी सेवा समिती, आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी केले आहे.

Web Title: Come on, to Somnath's camp; Appeal by Dr. Vikas Amte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.