शेतकऱ्यांच्या विकासासाठी रस्त्यावर उतरू - नरेश पुगलिया
By Admin | Published: October 5, 2015 01:30 AM2015-10-05T01:30:45+5:302015-10-05T01:30:45+5:30
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू. शेतकरी हा केंद्रबिंदू माणून काँग्रेसने कार्य केले आहे. मात्र शेतकरी हवालदिल झाले आहे.
शेतकरी मेळावा : माती परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन
राजुरा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू. शेतकरी हा केंद्रबिंदू माणून काँग्रेसने कार्य केले आहे. मात्र शेतकरी हवालदिल झाले आहे. त्यांना संरक्षण देण्यासाठी वेळ पडल्यास मोठे आंदोलन उभारू, असे प्रतिपादन माजी खासदार नरेश पुगलिया यांनी येथील शिवाजी महाविद्यालयात आयोजित शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी केले.
स्थानिक किसान भवन येथे वृक्षारोपण आणि माती परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना शिवाजीराव मोघे म्हणाले, शेतकऱ्यांना माती परीक्षणाची सोय ग्रामीण क्षेत्रात उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे उपाध्यक्ष अनिल पिल्लई, उप-महाव्यवस्थापक आशिष पसबोला, पंचायत समिती सभापती निर्मला कुळमेथे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, साईनाथ बुचे, संजय पेटकर, प्राचार्य दौलतराव भोंगळे, संभाजी वारकड, संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. मुर्लीधरराव धोटे, उपाध्यक्ष दत्तात्रेय येगिनवार, मध्यवर्ती बँकेचे संचालक दिलीप नलगे, गजानन गावंडे, अशोक नागपुरे, वसंत मांढरे, देवेंद्र बेले, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, प्रवीण पडवेकर, स्वामी येरोलवार, बी.एच. अंगलवार, अशोक देशपांडे, प्रा.राजेश खेरानी, प्रा. डी.डी. रायपुरे, प्रा. व्ही.एस. आत्राम, प्रा. के.डी. येगिनवार, प्रा. संजय ढवस, प्रा. आर.एस. गिरडकर, प्रा. विकास बल्की, प्रा. विशाल दुबे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दौलतराव भोंगळे यांनी केले. संचालन प्रा. बी.यू. बोर्डेवार यांनी केले. आभार जि.प. सदस्य अविनाश जाधव यांनी मानले. या कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)