दिलासा : आठ दिवसांपासून मृत्यूदर घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:27 AM2021-05-10T04:27:39+5:302021-05-10T04:27:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : मागील महिनाभरापासून कोरोना विषाणूने शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत अक्षरश: दहशत माजवली आहे. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील महिनाभरापासून कोरोना विषाणूने शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत अक्षरश: दहशत माजवली आहे. त्यामुळे राज्य सरकारने लाॅकडाऊन केले आहे. दरम्यान, आता रुग्णसंख्या अंशत: कमी होत असून, मृत्यूदरही मागील महिन्याच्या तुलनेत कमी झाल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे थोडाफार का होईना, दिलासा मिळाला आहे. मात्र, कोरोनाची दहशत अद्यापही संपलेली नाही.
मागील वर्षी मार्च महिन्यापासून सुरु झालेला कोरोनाचा प्रकोप मध्यंतरी कमी झाला होता. त्यामुळे जनजीवन सुरळीत झाले होते. मात्र, आता पुन्हा एप्रिल महिन्यापासून कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली. अनेकांना रुग्णालयात बेडसुद्धा मिळणे कठीण झाले होते. मागील महिन्याचा विचार केल्यास १५ एप्रिलनंतर सातत्याने मृत्यूदर वाढत होता. यामध्ये २२ एप्रिलला २२ रुग्ण तर २३ रोजी ३४ रुग्ण आढळले होते. मध्यंतरी एकादिवशी हा आकडा ३७वर जावून पोहाेचला होता. तर २६ ते ३० एप्रिलपर्यंत हा आकडा २० ते ३०च्या दरम्यान होता. दरम्यान, मे महिन्याच्या सुरुवातीपासून ८ मेपर्यंत हा आकडा १५ ते २० च्या दरम्यान स्थिरावलेला बघायला मिळाला. केवळ २ मे रोजी २५ जणांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत हा आकडा २० ते २२च्या घरात आहे. येत्या काही दिवसात मृत्यूदर आणखी कमी होणार असून, जिल्हावासियांना दिलासा देणारा राहील, असा विश्वासही वैद्यकीय अधिकारी व्यक्त करत आहेत. मात्र, नागरिकांनी बेफिकिरी न दाखवता नियमानुसार मास्क, सॅनिटायझर तसेच गर्दीत जाणे टाळणे सध्या तरी गरजेचे असल्याचे मतही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
बाॅक्स असा आहे मृत्यूदर
मे - २०२१
दि. मृत्यू
१.५ - २४
२.५ - २५
३.५ - २२
४.५ - २२
५.५ - २३
६.५ - १५
७.५ - २३
८.५. - २१
एप्रिल २०२१
२२.४. २८
२३.४. ३४
२४.४. २१
२५.४. ३४
२६.४. २३
२७.४. १७
२८.४. २०
२९.४. २९
३०.४. २८
लिंगनिहाय कोविड रुग्ण टक्केवारीत
पुरुष ६०.३७
महिला ३९.३
बाॅक्स
असे आहेत रुग्ण
जिल्ह्यातील ६९,३५२
जिल्ह्याबाहेरील १,१०५
राज्यातील ९१
एकूण - ७०,५४८
बाॅक्स
वयोगटानुसार रुग्ण
० ते ५ - ८८१
६ ते १८- ६०३०
१९ ते ४० - ३१,५७८
४१ ते ६० - २४,४१०
६० वर्षांवरील - ७,६४९
बाॅक्स
आजाराचे प्रमाण
लक्षणे नसलेले ११२५
सौम्य लक्षणे असेलेले ९३९
मध्यम लक्षणे असलले ६८८
गंभीर लक्षणे असलेले १६९
ऑक्सिजनवर असलेले ५९३
व्हेंटिलेटरवर असलेले ३३
आयसीयूमध्ये असलेेले १९१
---
तालुकानिहाय मृत्यू
चंद्रपूर मनपा - ४२६
वरोरा - ९९
मूल - २०
चिमूर - ८१
राजुरा - ४८
चंद्रपूर - ७१
बल्लारपूर - ७१
भद्रावती - ६७
ब्रह्मपुरी - ७४
नागभीड - ४०
सिंदेवाही - २१
सावली - ०६
कोरपना - २५
जिवती - ०५
गोंडपिपरी - २३
पोंभुर्णा - ०३
(ही आकडेवारी ८ मेपर्यंतची आहे)