दिलासादायक ! पॉझिटिव्हपेक्षा निगेटिव्ह होणाऱ्यांची संख्या अधिक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:30 AM2021-04-28T04:30:58+5:302021-04-28T04:30:58+5:30
जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ५५ हजार ६८० झाली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ३९ हजार ३१ झाली आहे. ...
जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ५५ हजार ६८० झाली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ३९ हजार ३१ झाली आहे. सध्या १५ हजार ५३४ बाधितांवर उपचार सुरू आहेत. ३ लाख ६४ हजार ९३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ लाख २९ हजार ५९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८२८ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ७६३, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली २७, यवतमाळ २५, भंडारा सात, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे. नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी तसेच ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
असे आहेत मृतक
आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपुरातील गजानन महाराज चौक परिसरातील ५१ वर्षीय पुरुष, दत्तनगर वाॅर्ड येथील ६२ वर्षीय महिला, स्वावलंबीनगर येथील ६३ वर्षीय महिला, तुकूम येथील ६० वर्षीय महिला, पंचशील चौक परिसरातील ४७ वर्षीय महिला, दादमहल वाॅर्ड येथील ५० वर्षीय पुरुष, भेंडाळा येथील ६० वर्षीय पुरुष, राजुरा तालुक्यातील ५२ वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील जिजामाता वाॅर्ड येथील ५५ वर्षीय पुरुष, बोर्डा येथील ५५ वर्षीय पुरुष, कळमगव्हाण येथील ३० वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील पंचशीलनगर येथील २७, ३३ व ६६ वर्षीय पुरुष व ३७ वर्षीय महिला, गोंडपिपरी तालुक्यातील ६३ वर्षीय पुरुष, तर वणी-यवतमाळ येथील ८५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
तालुकानिहाय बाधित
चंद्रपूर मनपा ४९५
चंद्रपूर तालुका ११६
बल्लारपूर ४४
गोंडपिपरी २३
राजुरा ४०
चिमूर ३५
वरोरा ६८
कोरपना १२२
जिवती १२
अन्य १६