स्वच्छतागृहाच्या मागणीसाठी आयुक्तांना निवेदन
By admin | Published: January 15, 2017 12:50 AM2017-01-15T00:50:50+5:302017-01-15T00:50:50+5:30
शहरातील व्यवसायिक व गर्दीच्या ठिकाणी चंद्रपूर महानगरपालिकेने महिलांकरिता स्वच्छतागृह उभारून द्यावीत, ..
चंद्रपूर : शहरातील व्यवसायिक व गर्दीच्या ठिकाणी चंद्रपूर महानगरपालिकेने महिलांकरिता स्वच्छतागृह उभारून द्यावीत, या मागणीचे निवेदन काँग्रेसच्या माजी प्रदेश सचिव सुनिता लोढीया यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने चंद्रपूर मनपाचे आयुक्त संजय काकडे यांना शुक्रवारी देण्यात आले.
मागील तीन दिवसांपासून चंद्रपूर शहराची पाहणी करण्याकरिता केंद्रीय समिती आलेली आहे. त्या समितीद्वारे स्वच्छ चंद्रपूर, सुंदर चंद्रपूर शहराची पाहणी करून पुरस्कारासाठी गुण देणार आहेत. मात्र, महिलांना ५० टक्के आरक्षण असुनसुद्धा सार्वजनिक व व्यवसायिक जागेत महिलांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध नाही. याबाबत महिलाकडून वारंवार मागणी करूनही स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्यात आले नाही.
त्यामुळे शहर स्वच्छ व सुंदर करून चालणार नाही, तर महिलांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे, यासाठी महिलांनी चंद्रपूर महानगरपालिकेसमोर निदर्शने केली व त्वरित स्वच्छतागृह उभारण्यात यावे, या मागणीचे निवेदन आयुक्तांना दिले.
याप्रसंगी माजी प्रदेश सचिव सुनिता लोढीया, प्रदेश सचिव डॉ. आसावरी देवतळे, ज्योती कवठेकर, वंदना भागवत, शालिनी भगत, मुमताज शेख, रितू गजबाटे, कविता मानकर, संगीता पाल, रूहीना शेख, पु्ष्प वडस्कर, मीना मत्ते, दुर्गा धानोरे, अर्चना उचके, भाग्यश्री रगडे, सुनंदा कोवले, माया तरारे, वैशाली पोहनकर, दुर्गा वैरागडे, कविता काहोले, चंदा कुळमेथे, रेवती उपरे, राधिका पेंदाम आदी महिला उपस्थित होत्या.(नगर प्रतिनिधी)