मूल शहराच्या विकासासाठी कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:20 AM2021-07-02T04:20:09+5:302021-07-02T04:20:09+5:30
चंद्रपूर : प्रत्येक निवडणुकीत मूल शहराने मला भरभरून प्रेम दिले. त्या प्रेमाचा उतराई होण्याचा मी नेहमीच प्रयत्न करतो. त्याचाच ...
चंद्रपूर : प्रत्येक निवडणुकीत मूल शहराने मला भरभरून प्रेम दिले. त्या प्रेमाचा उतराई होण्याचा मी नेहमीच प्रयत्न करतो. त्याचाच एक भाग म्हणून वार्ड नं. १४ च्या रिक्रियेशन सेंटर व गांधी चौकातील तसेच पोस्ट ऑफिस समोरील चौकातील सौंदर्यीकरणाचे उद्घाटन करताना आनंद होत आहे, असे मत विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
मूल शहरात वैशिष्ट्यपूर्ण निधीतून निरनिराळ्या चौकांचे सौंदर्यीकरण करण्याचे काम सुरू आहे. या अंतर्गत गांधी चौक येथे डॉक्टर, स्वच्छता दूत, पोलीस यांच्या मूर्ती तसेच पोस्ट ऑफिस समोर आदिवासी नृत्य करत असणाऱ्या महिलांच्या मूर्ती लावण्यात आल्या. त्यांचे उद्घाटन आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. तसेच वार्ड नं. १४ च्या रिक्रियेशन सेंटरचे उद्घाटन ही याप्रसंगी करण्यात आले.
नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला भोयर, नगरपरिषद उपाध्यक्ष नंदू रणदिवे, मूलचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, भाजपा शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, नगरपरिषद सदस्य प्रशांत समर्थ, चंद्रकांत आष्टनकर, आशा गुप्ता, वंदना वाकडे, प्रशांत लाडवे, मनिषा गांडलेवार, महेंद्र करकाडे, अनिल साखरकर, प्रभा चौथाले, विद्या बोबाटे, प्रशांत बोबाटे, ललीता फुलझेले, पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, वनमाला कोडापे आदींची उपस्थिती होती.