दलित वस्त्यांच्या सुधारणेसाठी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 10:55 PM2018-12-26T22:55:23+5:302018-12-26T22:55:39+5:30

दलित वस्त्यांना सर्वांगीण सुविधा देवून विकास करण्याचे धोरण शासनाने आखले आहे. त्याअंतर्गत आ. नाना श्यामकुळे यांनी मोठा निधी खेचून आणत सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून कामगार झोपडपट्टी प्रभागातील दलित वस्तीमध्ये कोट्यावधीची कामे सुरू आहेत. त्यामुळे दलित वस्तीचे स्वरूपच बदलत असून आपण दलित वस्त्यांच्या सुधारणेसाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

Committed to the improvement of Dalit settlements | दलित वस्त्यांच्या सुधारणेसाठी कटिबद्ध

दलित वस्त्यांच्या सुधारणेसाठी कटिबद्ध

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर : विकास कामांचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दलित वस्त्यांना सर्वांगीण सुविधा देवून विकास करण्याचे धोरण शासनाने आखले आहे. त्याअंतर्गत आ. नाना श्यामकुळे यांनी मोठा निधी खेचून आणत सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून कामगार झोपडपट्टी प्रभागातील दलित वस्तीमध्ये कोट्यावधीची कामे सुरू आहेत. त्यामुळे दलित वस्तीचे स्वरूपच बदलत असून आपण दलित वस्त्यांच्या सुधारणेसाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त दलित वस्त्यांच्या सर्वांगीण विकास कार्यक्रमाअंतर्गत चंद्रपूर विधानसभा कामगार झोपडपट्टी प्रभागातील अनेक सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनील फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, बालकल्याण सभापती जयश्री जुमडे, झोन सभापती अजय सरकार, नगरसेवक अमजद अली इरानी, नगरसेविका संगीता भोयर, समाज कल्याण विभाग उपायुक्त प्रसाद कुळकर्णी, कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग संतोष जाधव आदी उपस्थित होते.
आमदार नाना श्यामकुळे यांनी विकास कार्याचा आढावा घेत दलित वस्तींच्या विकासासाठी तसेच अन्य ठिकाणी सर्व सोयींनी युक्त असा विकास करण्यासाठी पुन्हा निधी खेचून आणू असे आश्वासन दिले. भाजपच्या राजवटीत या शहराचा सर्वकष विकास होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी महापौर अंजली घोटेकर यांनी मार्गदर्शन केले.
त्यानंतर १० ठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Committed to the improvement of Dalit settlements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.