रोजगारासाठी औद्योगिक विकास करून ब्रह्मपूरी जिल्हा निर्मितीसाठी कटिबध्द
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 02:39 PM2024-11-08T14:39:55+5:302024-11-08T14:41:16+5:30
विजय वडेट्टीवार : ब्रह्मपूरी येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : गेल्या दहा वर्षांपासून ब्रह्मपूरी मतदारसंघातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून येथील लोकप्रतिनिधीत्वाची सूत्रे हाती दिली. या आशीर्वादाने मिळालेल्या बळाच्या जोरावर जनमताच्या विश्वासाला तडा न जाऊ देता कोट्यवधींचा विकास निधी खेचून आणून मतदारसंघाचा विकास केला.
भविष्यात येथे औद्योगिकरणातून प्रगती साधून रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार तसेच विकसित ब्रह्मपुरीला जिल्हा बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, अशी ग्वाही महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली. ब्रह्मपूरी विधानसभा निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी झालेली विकासकामे सांगून ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघाचे व्हिजनही त्यांनी स्पष्ट केले.
उद्घाटनाप्रसंगी प्रामुख्याने विमुक्त जाती भटक्या जमाती सेल प्रदेशाध्यक्ष पल्लवी रेनके, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. देवीदास जगनाडे, राष्ट्रवादी काँग्रेस नेते दामोधर मिसार, अॅड. मनोहर उरकुडे, कम्युनिस्ट पक्षाचे नेते विनोद झोडगे, काँग्रेस ओबीसी सेलचे राष्ट्रीय समन्वयक अॅड. गोविंद भेंडारकर, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी नगराध्यक्षा वनिता ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष वासु सोंदरकर, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी जि.प. सदस्य डॉ. राजेश कांबळे, रिपाइं गवई गटाचे नेते विजय रामटेके, एकलव्य सेनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद भन्नारे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष इक्बाल जेसानी, इनायत पठाण, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, जिल्हा काँग्रेस सचिव विलास विखार, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, योगेश मिसार यांसह महाविकास आघाडी व घटक पक्षातील सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.