सैनिकांचे मनोबल उंचावण्यास कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 01:37 AM2018-01-24T01:37:44+5:302018-01-24T01:38:00+5:30
देशाच्या सीमेवर तणाव स्थिती व युद्ध असे दोन प्रकार घडतात. मात्र, अशा अप्रिय घटनांमध्ये आपल्या सेनेची क्षती होऊ नये, हा सरकारचा नेहमीच प्रयत्न असतो. सैनिकांचे मनोबल वाढावे आणि त्यांच्या सोयी-सुविधांत वाढ व्हावी याकरिता २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : देशाच्या सीमेवर तणाव स्थिती व युद्ध असे दोन प्रकार घडतात. मात्र, अशा अप्रिय घटनांमध्ये आपल्या सेनेची क्षती होऊ नये, हा सरकारचा नेहमीच प्रयत्न असतो. सैनिकांचे मनोबल वाढावे आणि त्यांच्या सोयी-सुविधांत वाढ व्हावी याकरिता २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.
बल्लारपूर येथील महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालयाच्या प्रांगणात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त आयोजित सैनिकांना मानवंदनाच्या ‘सलाम सैनिक’ या कार्यक्रमात ते बोलत होते. येथील श्री लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्था, लक्ष्य बहुउद्देशिय संस्था व संत गाडगेबाबा वाचनालयाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून मुंबई येथील सैनिक परिवार मित्रचे हिरालाल यादव होते. अध्यक्षस्थानी ना. अहीर तर प्रमुख अतिथी म्हणून वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष हरिश शर्मा, उपाध्यक्ष मीना चौधरी, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, मुख्याधिकारी विपीन मुद्धा, तहसीलदार विकास अहीर, ठाणेदार प्रदीप शिरस्कर, संजय कायरकर, प्राचार्य ज्योती भूते, माजी नगराध्यक्ष लखनसिंह चंदेल आदी उपस्थित होते.
यावेळी जवानांच्या स्मृती स्तंभाला पुष्पचक्र वाहून त्यांना सलामीने अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केल्यानंतर यादव तसेच ना. अहीर यांचा सत्कार करण्यात आला. श्रीनिवास सुंचूवार यांनी कार्यक्रमाची भूमिका विषद केली. संचालन प्रा. मनिष कायरकर व आभार इजाज शेख यांनी मानले.