विश्वास नांगरे पाटील आज साधणार युवकांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 10:49 PM2019-01-15T22:49:27+5:302019-01-15T22:49:53+5:30
महाराष्ट्रातील युवकांच्या गळ्यातील ताईत असणारे आणि आपल्या प्रेरणादायी वक्तृत्वामुळे अनेकांच्या आयुष्याचा कायापालट करणारे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील चंद्रपूर जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा इच्छुक विद्यार्थ्यांशी बुधवार दि. १६ जानेवारीला संवाद साधणार आहेत. या स्पर्धा परीक्षा महोत्सवाची युवकांनाही चांगलीच उत्सुकता लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्रातील युवकांच्या गळ्यातील ताईत असणारे आणि आपल्या प्रेरणादायी वक्तृत्वामुळे अनेकांच्या आयुष्याचा कायापालट करणारे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील चंद्रपूर जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा इच्छुक विद्यार्थ्यांशी बुधवार दि. १६ जानेवारीला संवाद साधणार आहेत. या स्पर्धा परीक्षा महोत्सवाची युवकांनाही चांगलीच उत्सुकता लागली आहे.
राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सरकारी नोकरीमधील टक्का वाढावा. यासाठी मिशन सेवा हे अभियान सुरू केले. या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाचे वेगवेगळ्या स्तरावरील प्रयत्न जिल्हा प्रशासनाने सुरू केलेले आहेत. ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते मिशन सेवा स्पर्धा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर विविध विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
लोकमतला अनेकांचे फोन
विश्वास नांगरे पाटील यांना ऐकण्यासाठी युवक आतुर झालेले आहेत. त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळावी, यासाठी अनेक युवकांनी ‘लोकमत’शी संपर्क साधून कार्यक्रमाची बारीकसारीक माहिती जाणून घेतली.