मुनगंटीवार यांनी साधला नागरिकांशी सुसंवाद
By admin | Published: November 29, 2015 01:52 AM2015-11-29T01:52:54+5:302015-11-29T01:52:54+5:30
बल्लारपूर शहरातील गोकुलनगर वॉडार्तील कादरिया मस्जीद चौकात लाल दिव्याची गाडी ताफ्यासह पोहचते,
१४ वॉर्डात घेतल्या सभा : जनता आनंदली, तक्रारी व सूचनांचा वर्षाव
बल्लारपूर : बल्लारपूर शहरातील गोकुलनगर वॉडार्तील कादरिया मस्जीद चौकात लाल दिव्याची गाडी ताफ्यासह पोहचते, या ताफ्यात फिरते जनसंपर्क कार्यालय सुध्दा असते, लाल दिव्याच्या गाडीतून राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्या सहकाऱ्यांसह उतरतात आणि सुरू होतो नागरिकांशी सुसंवाद. एकाच दिवशी बल्लारपूर शहरातील तब्बल १४ वॉर्डात फिरून ना. मुनगंटीवार यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरिकांनी या भेटीने मोहरून जात तक्रारी व सूचनांचा वर्षाव केला.
राज्याचे वित्त व वनमंत्री तसेच चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज शनिवारी बल्लारपुर शहरातील १४ प्रमुख चौकांमध्ये चौक जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून नागरिकांशी सुसंवाद साधला. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपा नेते प्रमोद कडू, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस हरीश शर्मा, बल्लारपुर भाजपाचे अध्यक्ष शिवचंद द्विवेदी, रेणुका दुधे, अजय दुबे, निलेश खरबडे, किशोर मेश्राम, मनीष पांडे, धर्मप्रकाश दुबे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
कादरीया मस्जीद चौकानंतर विवेकानंद वॉर्ड, दिनदयाल वॉर्ड, मौलाना आझाद वॉर्ड, झाकीर हुसैन वॉर्ड, महाराणा प्रताप वॉर्ड, दादाभाई नौरोजी वॉर्ड, गणपती वॉर्ड, बालाजी वॉर्ड, महात्मा गांधी वॉर्ड, भगतसिंग वॉर्ड, लोकमान्य टिळक वॉर्ड, साईबाबा वॉर्ड, गौरक्षण वॉर्ड परिसरातील प्रमुख चौकांमध्ये वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जनसंपर्क करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. बल्लारपूर शहराच्या विकासासाठी आपण सदैव कटिबध्द असल्याची ग्वाही देत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या शहरातील नागरिकांनी भरभरून प्रेम दिले आहे. पाणी पुरवठा योजना, नाटयगृहाचे बांधकाम, उपकोषागार कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, स्टेडियमची निर्मिती, अशी विकासकामांची मोठी मालिका या शहरात आपण निर्माण केली आहे. नुकताच या शहराच्या विकासासाठी ३० कोटी रू. निधी आपण मंजूर करविला आहे. येत्या काळात २० कोटी रू. निधीला मंजुरी मिळणार आहे. या ५० कोटी रू. विकास निधीचे नियोजन कसे असावे, यादृष्टीने नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी आपण या चौक जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून येथे आलो आहे, असेही सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले. यापुवीर्ही बल्लारपूर विकास परिषदेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधुन बल्लारपूर शहर विकास आराखडा तयार करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतल्याचेही त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)