बुंद साधणार पंतप्रधानासोबत संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 10:51 PM2019-01-28T22:51:01+5:302019-01-28T22:51:13+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने दिल्ली येथे आयोजित ‘परीक्षा पे चर्चा’ भाग २ या उपक्रमात चंद्रपूर येथील चांदा पब्लिक स्कूलची वर्ग नववीतील विद्यार्थिनी बुंद दीप दवे ही पंतप्रधानासोबत मंगळवार दि. २९ जानेवारी रोजी संवाद साधणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने दिल्ली येथे आयोजित ‘परीक्षा पे चर्चा’ भाग २ या उपक्रमात चंद्रपूर येथील चांदा पब्लिक स्कूलची वर्ग नववीतील विद्यार्थिनी बुंद दीप दवे ही पंतप्रधानासोबत मंगळवार दि. २९ जानेवारी रोजी संवाद साधणार आहे.
‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी १७ जानेवारीपर्यंत इयत्ता ९ वी ते १२ वीचे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्याकरिता आॅनलाईन प्रवेश घ्यावयाचा होता. यामध्ये विद्यार्थ्यी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी घोषवाक्य स्पर्धा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित ‘एक्झाम वॉरिअस’ या पुस्तकाशी प्रेरीत होऊ ‘आय एम इम्प्रेस’ ही स्पर्धा घेण्यात आली. या पुस्तकाच्या माध्यमातून हसत खेळत शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांशी पालकांची ओळख करुन देण्यात आली. यामध्ये चांदा पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी बुंद दीप दवे ही पात्र ठरली. त्यामुळे ती ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमात सहभागी होणार आहे.
बुंदच्या यशाबद्दल शाळेच्या संचालिका स्मिता जीवतोडे, प्राचार्य सुरेखा पांडेय यांनी कौतुक केले. तर उपक्रमांकरिता आम्रपाली नगराळे, सिमा आमटे व अर्चना जाधव यांनी तिला सहकार्य केले.