मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ग्रामस्थांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 10:45 PM2018-09-25T22:45:54+5:302018-09-25T22:46:14+5:30
मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी हॅबीटॅट सोसायटीने चारगाव परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. वन्यप्राण्यांचा संचार वाढल्याने चारगाव येथील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परिसरातील शेतकरी शेतीवर निर्भर आहे. पण उभे पीक असल्याने ऐन हंगामाच्या वेळेवर वाया जाते. शेतकरी ताजने यांच्या शेतालगतच्या तळ्यात वाघाने भरदिवसा रानटी डुकराची शिकारी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी हॅबीटॅट सोसायटीने चारगाव परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला.
वन्यप्राण्यांचा संचार वाढल्याने चारगाव येथील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परिसरातील शेतकरी शेतीवर निर्भर आहे. पण उभे पीक असल्याने ऐन हंगामाच्या वेळेवर वाया जाते. शेतकरी ताजने यांच्या शेतालगतच्या तळ्यात वाघाने भरदिवसा रानटी डुकराची शिकारी केली. शिवाय काही दिवसांपूर्वी बैलांवर वाघाने हल्ला केला होता. परिणामी, शेतकरी शेतात जायला घाबरत आहेत. शेतीवरील संकट दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी मागणी शेतकºयांनी केली. संस्थेच्या तज्ज्ञांनी सरपंच व गावकºयांसोबत चर्चा केली. वनकर्मचारी गोधने व हॅबिटॅट कॉन्सर्व्हशन सोसायटीच्या सदस्यांनी समस्यावर तोडगा काढण्याचेच आश्वास दिले. महाऔष्णिक केंद्राच्या पाईप लाईन परिसरात काटेरी वनस्पती व झुडूपी जंगलाचे प्रमाण वाढले. शेतीचे नुकसान करत आहेत व वाघसुद्धा शिकारीसाठी रानटी डुक्करांच्या मागे गावाजवळ येत आहे. काही परिसर हा प्लाट करून विक्री झालेला आहे. तेथे कचरा खूप वाढल्याने आम्हाला धोका निर्माण झाला आहे. तरी हा परिसर स्वच्छ केल्यास वन्यप्राणी गावाजवळ येणार नाही, असे ग्रामस्थ म्हणाले.
चारगाव परिसर हा पुनर्वसन होऊन तिथेच बाजूला वसलेला आहे. पुनर्वसन झालेल्या परिसरातच काटेरी वनस्पती वाढलेली असल्याने महाऔष्णिक केंद्राने तो परिसर स्वछ करावा अशी मागणी केली. त्यासाठी हॅबिटॅट कॉन्सर्व्हशन सोसायटीच्या वतीने महाऔष्णिक केंद्राचे मुख्यअभियंता जयंत बोबडे यांना निवेदन देण्यात आले. त्यांच्याकडून एकदा परिसर बघून खात्री करून तो परिसर स्वछ केल्या जाईल, असे सांगण्यात आले.
चंद्रपूर वनविभाग हा ऊर्जानगर वसाहत, विचोळा, छोटा नागपूर, पाईप लाईन, अवंडा डॅम, तिरवंजा या परिसरात वर्षभरापासून वाघ-बिबट यांच्या हालचालीवर नजर ठेऊन आहे. हॅबिटॅट कॉन्सर्व्हशन सोसायटीचे दिनेश खाटे, रविकिरण गेडाम, प्रणय मगरे, चैतन्य खरतड, केशव कुळमेथे उपस्थित होते.