शिक्षणातूनच समाजाची प्रगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:00 AM2019-04-20T00:00:28+5:302019-04-20T00:00:53+5:30
शिक्षणातूनच माणूस खऱ्या अर्थाने घडतो. समाजाची प्रगती होते. त्यामुळे माणसाचे उत्थान व्हावे असेच शिक्षण सर्वांना मिळावे, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाच्या विदर्भ प्रांत अध्यक्ष प्राचार्य डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी केले. न्यू इंडिया कॉन्व्हेंटमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शिक्षणातूनच माणूस खऱ्या अर्थाने घडतो. समाजाची प्रगती होते. त्यामुळे माणसाचे उत्थान व्हावे असेच शिक्षण सर्वांना मिळावे, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाच्या विदर्भ प्रांत अध्यक्ष प्राचार्य डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी केले. न्यू इंडिया कॉन्व्हेंटमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. शरदचंद्र सालफळे मंचावर प्रांत उपाध्यक्ष डॉ.शशी अग्रवाल, विनोदकुमार पांडे प्रकाश कौर धीर व अन्य उपस्थित होते.
प्राचार्या डॉ. चक्रेदव म्हणाल्या, स्वामी विवेकानंद म्हणतात आपल्या आत एक संपूर्ण मनुष्य विद्यमान आहे. शिक्षणाच्या माध्यमातून त्याला बाहेर काढायचे असते. दगडातून मुर्ती प्रकट करतो. मूर्तीकार अथवा विद्यार्थी एखादे चित्र काढताना जेव्हा स्वत:ला हरवतो तेव्हा खरे तर तो स्वत:ला सापडलेला असतो. शिक्षणात नेमके हेच व्हायला हवे आहे. इंग्रजांच्या आगमनानंतर कला व अध्यात्माचे शिक्षण बंद झाले. पुनरूत्थान आवश्यकता आहे. त्यासाठी अनुसंधानाची आवश्यकता आहे.
विदर्भ प्रांत उपाध्यक्ष डॉ. अग्रवाल यांनी संस्थेचे कार्य व आवश्यकतेविषयी विचार व्यक्त करून म्हणाल्या, शिक्षणात भारतीयता येण्यासाठी भारतीय शिक्षण मंडळाची स्थापना झाली.
भारतीय म्हणजे एकात्म विचार आपल्या ध्येयपूर्तीसाठी अनुसंधान, प्रबोधन, प्रकाशन व संघटन या पाच सोपानांच्या माध्यमातून भारतीय शिक्षण मंडळ काम करते. त्यासाठी अनुसंधान प्रकोष्ठ, शैक्षणिक प्रकोष्ठ, महिला प्रकल्प, शालेय प्रकल्प, गुरुकुल प्रकल्प व युवा आयाम अशा प्रकल्प प्रकोष्ठांची रचना भारतीय शिक्षण मंडळाने केली आहे. भा.शि.मंडळाचे विस्तारक पांडे यांनी संघटनगीत सांगितले तर वैयक्तिक गीत मंगेश देऊरकर यांनी सादर केले. संचालन मंडळाच्या चंद्रपूर जिल्हा सचिव प्रकाश कौर धीर यांनी केले. आभार सुनीता सोमाणी यांनी मानले. संघटनमंत्र व शांतीमंत्र अश्विनी दाणी यांनी गायले. यावेळी अखिल भारतीय महिला प्रकल्प सहप्रमुख अरूंधती कावडकर, जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कुंभारे कुंभारे, जयश्री भारत, माया मिश्रा, संजना कोंतमवार, मंगेश देऊरकर व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.