सिंदेवाहीतील समाजमंदिर धूळ खात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:32 AM2021-08-12T04:32:19+5:302021-08-12T04:32:19+5:30
झुडपांचा विळखा सिंदेवाही : राष्ट्रीय महामार्गावर असलेली समाजमंदिराची वास्तू २० वर्षांपासून उभी आहे. काही वर्षांपासून दुर्लक्षित असल्याने समाजमंदिर ...
झुडपांचा विळखा
सिंदेवाही : राष्ट्रीय महामार्गावर असलेली समाजमंदिराची वास्तू २० वर्षांपासून उभी आहे. काही वर्षांपासून दुर्लक्षित असल्याने समाजमंदिर धूळ खात, झुडपांच्या विळख्यात आहे. या समाजमंदिराची तत्काळ दुरुस्ती करून सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
शहरातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या समाजमंदिराचा पूर्वी मोठा उपयोग व्हायचा. श्री सोमेश्वर महाराज मंदिर देवस्थान परिसरातील समाजमंदिर कमी खर्चात उपयोगी पडणारे होते. ग्रामपंचायतीमार्फत त्याची देखभाल व काळजी घेणे सुरू होते. शहरातील नाटक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम, लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांकरिता या समाजमंदिराचा उपयोग केला जात होता. तेव्हा हे समाजमंदिर शहराची शान म्हणून ओळखले जात होते. मात्र आता या समाजमंदिराची दुरवस्था बनली आहे. टीन शेड फुटले आहे, भिंतीला तडे गेले आहेत, सुरक्षा भिंतीला छिद्र पडले आहे. झाडाझुडपांचा विळखा पडला आहे. सर्वांच्या उपयोगी पडणाऱ्या शहरातील एवढ्या मोठ्या वास्तूकडे नगरपंचायतीचे मात्र दुर्लक्ष होत आहे.