कामगारांचे आंदोलन दडपण्यासाठी प्रशासनावर कंपनीचा दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 10:41 PM2018-12-05T22:41:53+5:302018-12-05T22:42:26+5:30

जी.एम.आर. कंपनीने न्यायासाठी संघटनेच्या माध्यमातून पुढे येऊन लढणाऱ्या कामगारांना कामावरून काढून टाकले. हे कामगार कामावर परत घेण्यासाठी बेमुदत आंदोलन करीत आहेत. एका आंदोलकाला त्याची प्रकृती बिघडल्याच्या नावाखाली उपोषण मंडपातून उचलून रुग्णवाहिकेअभावी पोलिसांच्या गाडीतून नेले. या घटनेचा निषेद असून यावरून प्रशासनावर जी.एम.आर. कंपनीचा दबाव असे दिसून येते, असा आरोप जी.एम.आर. पॉवर कामगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश चोखारे यांनी बुधवारी चंद्रपूर प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत केला.

The company's pressure on the administration to suppress workers' agitation | कामगारांचे आंदोलन दडपण्यासाठी प्रशासनावर कंपनीचा दबाव

कामगारांचे आंदोलन दडपण्यासाठी प्रशासनावर कंपनीचा दबाव

Next
ठळक मुद्देदिनेश चोखारे यांचा आरोप : आंदोलकाला पोलिसांच्या गाडीत नेले

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जी.एम.आर. कंपनीने न्यायासाठी संघटनेच्या माध्यमातून पुढे येऊन लढणाऱ्या कामगारांना कामावरून काढून टाकले. हे कामगार कामावर परत घेण्यासाठी बेमुदत आंदोलन करीत आहेत. एका आंदोलकाला त्याची प्रकृती बिघडल्याच्या नावाखाली उपोषण मंडपातून उचलून रुग्णवाहिकेअभावी पोलिसांच्या गाडीतून नेले. या घटनेचा निषेद असून यावरून प्रशासनावर जी.एम.आर. कंपनीचा दबाव असे दिसून येते, असा आरोप जी.एम.आर. पॉवर कामगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश चोखारे यांनी बुधवारी चंद्रपूर प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत केला.
२८ पासून कामगारांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. आठ दिवस लोटूनही प्रशासन दखल घ्यायला तयार नाही. सहा. कामगार आयुक्तांनी बैठक बोलाविली. मात्र त्या बैठकीत कामगारांना आपले मानयला तयार नाही. जेव्हा की कामगारांकडे त्याचे पुरावे आहे. प्रशासनाने खरेच कामगार आहे वा नाही. कंपनी केवळ प्रशासनाची दिशाभूल करीत आहे. वस्तुस्थिती पुढे आणण्यासाठी प्रशासनाने याची चौकशी करायला हवी. मात्र असे दिसत नाही, असा आरोपही दिनेश चोखारे यांनी यावेळी केला. परशुराम विठ्ठल घाटे या आंदोलकाची प्रकृती चांगली असताना त्याला वैद्यकीय अधिकाºयांनी जबरदस्तीने मंडपातून उचलून नेले. त्याला रुग्णालयात न्यायचे होते, तर रुग्णवाहिका का आणली नाही. यावरून प्रशासन कंपनीच्या दबाबात असल्याचे दिसून येते, असा आरोपही चोखारे यांनी यावेळी केला आहे. यावेळी आंदोलनकर्ते उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांचा कंपनीशी संबंध नाही: जीएमआर
कथित कामगार संघटनेद्वारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. संघटनेद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या पत्रानुसार जे आरोप संघटनेद्वारे करण्यात आलेले आहेत. या संदर्भात जीएमआर वरोरा एनर्जीद्वारा सविस्तर लिखित उत्तर विविध सक्षम शासकीय संस्था तसेच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सादर केलेले आहे. त्यात वेळोवेळी विविध शासकीय संस्थेद्वारा आॅडिट, चौकशी, प्लांटला भेटी, कामगारांशी प्रत्यक्ष संवाद झालेला आहे. वेळोवेळी तसा अहवाल सादर केला. त्यात कुठलेही तथ्य आढळले नाही. वारंवार असे आरोप करुन प्रसिद्धी मिळविण्याचा कथित संघटनेचा मानस आहे, असे उत्तरात म्हटले आहे. कथित आंदोलनात जीएमआर कंपनीच्या परिसरातील कुठलेही कामगार सहभागी नसून कंपनीत १०० टक्के उपस्थिती आढळून आली आहे. या आंदोलनातील सहभागी व्यक्तींचा जीएमआर कंपनी यांच्याशी संबंध नाही, असेही जीएमआर कंपनीने आपल्या उत्तरात स्पष्ट केले आहे.

Web Title: The company's pressure on the administration to suppress workers' agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.