झाडांच्या विविध प्रजाती पाहून स्पर्धक गोंधळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:31 AM2021-08-21T04:31:58+5:302021-08-21T04:31:58+5:30
बल्लारपूर : असे कोणतेही घर नसेल की ज्यांच्याकडे विविध प्रजातींची रोपे लावलेली नसतील. परंतु त्यांची नावे काय? असा प्रश्न ...
बल्लारपूर : असे कोणतेही घर नसेल की ज्यांच्याकडे विविध प्रजातींची रोपे लावलेली नसतील. परंतु त्यांची नावे काय? असा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा मात्र मोठा गोंधळ उडतो. असाच गोंधळ राजस्थानी समाजाच्या सावन सहल या आयोजित कार्यक्रमात झालेला दिसला. विविध प्रजातींची झाडे पाहून स्पर्धक गोंधळले. त्यांना त्या प्रजातीची नावे सांगता आली नाही.
सध्या श्रावण मास सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर बल्लारपूर तालुका माहेश्वरी महिला संघटन, राजस्थानी महिला मंडळ व राममंदिर मित्रमंडळाच्या वतीने आमडीजवळ असलेल्या कैलास खंडेलवाल यांच्या फार्म हाउसमध्ये सावन सहल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांसाठी नितू गुप्ता व करुणा मालू यांनी खेळाचे आयोजन केले. यावेळी नावीन्यपूर्ण झाडाची नावे ओळखा हा कार्यक्रम घेण्यात आला. फार्महाऊसवर लावलेली १०० प्रजातींच्या झाडांपैकी ४० झाडांना टॅग लागले होते. त्यांची नावे सांगायची होती. यामध्ये बऱ्याच स्पर्धकांनी गुगलची मदतही घेतली. परंतु कोणालाही ४० झाडांची नावे ओळखता आली नाही. २५ पर्यंतच झाडांची नावे सांगता आली. त्यामध्ये सुचिता जैन, श्रद्धा मोहता, आनंद गुप्ता, रिना खटोड, निर्मला काबरा, अनुज अग्रवाल, गोविंद मालू यांना आयोजक कैलास खंडेलवाल यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले. यावेळी माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष जगदीश मुंदडा, जैन समाजाचे सुनील जैन, बिरजू बंग, अनुज अग्रवाल, कैलास मालू, नवनीत सारडा, गौरव अटल, अश्विन खंडेलवाल, अजय गुप्ता, राजू मुंदडा, संजय पोतदार उपस्थित होते.
200821\20210815_134235.jpg
रोपांची नाव शोधताना स्पर्धक