जिल्ह्यातील ९४ टक्के सातबारे संगणीकृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:31 AM2018-05-03T01:31:11+5:302018-05-03T01:31:11+5:30
डिजिटल इंडिया लॅन्ड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्रॉम मोहीमेअंतर्गत राज्यातील सर्व नागरिकांच्या सातबाराचे संगणीकरण करण्याचा कार्यक्रम राज्यभर सुरु आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यात ९४ टक्के सातबारा संगणीकृत झालेला असून लवकरच सामान्य नागरिकाला डीजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उपलब्ध होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : डिजिटल इंडिया लॅन्ड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्रॉम मोहीमेअंतर्गत राज्यातील सर्व नागरिकांच्या सातबाराचे संगणीकरण करण्याचा कार्यक्रम राज्यभर सुरु आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यात ९४ टक्के सातबारा संगणीकृत झालेला असून लवकरच सामान्य नागरिकाला डीजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उपलब्ध होणार आहे. राज्यात पहिल्या दहा जिल्ह्यामध्ये चंद्रपूरची घोडदौड सुरु आहे. यामध्ये उल्लेखनिय काम करणाऱ्या महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बुधवारी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी सत्कार केला.
महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महसूल विभागाने डिजिटल इंडिया लॅन्ड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्रॉम मोहिमेअंतर्गत महसूल कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत जिल्हयातील पंधराही तालुक्यातील संगणीकरणामध्ये सहभागी असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर जिल्हाधिकाºयांसह, अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, ज्यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविली गेली, ते निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाड, सीमा अहिरे, क्रांती डोंगरे, महादेव खेडकर, महसूल संघटनेचे विभागीय अध्यक्ष राजू धांडे, पटवारी संघाचे उपाध्यक्ष प्रकाश सुर्वे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गुणवंत कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना जिल्ह्याला डिजिटायझेशनमध्ये आणखी जोमाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. हा सत्कार सर्वांचाच असून त्याचे स्वरुप प्रातिनिधिक आहे. लवकरच जिल्हा १०० टक्के संगणीकरणाचे व डिजीटल स्वाक्षरीचे लक्ष गाठेल, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. शासकीय सेवेमध्ये जनतेची सेवा करण्याची संधी मिळते. त्यामुळे आपले दायित्व जाणून काम करणे महत्त्वाचे आहे. ही मोहीम यशस्वी करताना अनेकांना परिश्रम घ्यावे लागलेत. सातबारा डिजिटल झाल्यामुळे महसूल विभागाच्या नव्या युगाचा प्रारंभ झाला असून भविष्यात या विभागाच्या अनेक जबाबदाºया वाढणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या या कार्यामुळे समाधान वाटल्याचेही त्यांनी सांगितले.
यांचा झाला सन्मान
कोरपना तालुक्यातील तहसिलदार हरिषचंद्र गाडे, लिपिक सचिन गांजरे, मंडळ अधिकारी आर.पी.पचारे, तलाठी एम.एस.अन्सारी, पी.बी.कम्मलवार, व्ही.एम.मडावी, राजूरा नायब तहसिलदार किशोर साळवे, मंडळ अधिकारी निरंजन गोरे, तलाठी दीपक गोहणे, डि.वाय.पत्तीवार, लिपीक एम.जी.पेंदाम, तलाठी सुनिल रामटेके, विनोद गेडाम, समीर वाटेकर, राहुल श्रीरामवार, बल्लारपूर तालुक्यातील नायब तहसिलदार आर.एन.कुळसंगे, मंडळ अधिकारी दिलीप मोडके, तलाठी व्ही.एन.गणफाडे, एस.बी.कोडापे, एम.बी.कन्नाके, एस.ए.खरुले, आर.जी.चव्हान, लिपिक स्मिता डांगरे. मुल तालुका- नायब तहसिलदार एल.जी.पेंढारकर, लिपीक लक्ष्मीकांत बलसुरे, मंडळ अधिकारी किरण घाटे, तलाठी व्हि.व्ही.चिकटे, टि.ए.चव्हाण, एल.व्ही.जाधव, वाय.आर.सांगुळले, व्ही.डी.भसारकर. सावली तालुका- नायब तहसिलदार सागर कांबळे, तलाठी वाय.पी.मडावी, मंगेश गांडलेवार, लिपिक स्मिता बोरकुटे, गोंडपिंपरी तालुका- मंडळ अधिकारी खेमदेव गेडाम, तलाठी जयवंत मोरे, मनोज शेंडे, लिपीक भुषण रामटेके. पोंभूर्णा तालुका- नायब तहसिलदार मदन जोगदंड, लिपिक अजय देवतडे, मंडळ अधिकारी एस.बी.हजारे, तलाठी सुजित चौधरी, सुरज राठोड. भद्रावती तालुका- मंडळ अधिकारी गुणवंत वाभिटकर, तलाठी अनिल दडमल, दिनेश काकडे, प्रणाली तुडूरवार, योगेश गोहोकार. ब्रम्हपूरी तालुका- नायब तहसिलदार संदप्ीा पुंडेकर, लिपिक मनीषा उईके, तलाठी आकाश भाकरे, मधुकर खरकाटे, मंडळ अधिकारी नरेंद्र बोधे, डि.व्ही.चहारे, नागभिड तालुका- नायब तहसिलदार संदिप भांगरे, लिपिक रवि आवळे, मंडळ अधिकारी पुंडलिक मडावी, चिमूर तालुका- नायब तहसिलदार श्रीधर राजमाने, लिपिक पोणीर्मा पडोळे, मंडळ अधिकारी धनंजय बुराडे, तलाठी विनोंद डोंगरे आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.