काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाविरुद्ध चंद्रपुरात नगरसेवकाची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:37 AM2021-06-16T04:37:42+5:302021-06-16T04:37:42+5:30
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिनांक ८ जून २०२१ रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. चंद्रपूर शहरामध्ये असलेल्या बैठकीमध्ये पत्रकारांसमक्ष बोलत ...
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिनांक ८ जून २०२१ रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. चंद्रपूर शहरामध्ये असलेल्या बैठकीमध्ये पत्रकारांसमक्ष बोलत असताना भाजपाच्या काही नगरसेवकांनी त्यांची भेट घेतल्याचे व महानगरपालिका चंद्रपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचे लेखी निवेदन त्यांना दिल्याचे पत्रकारांसमक्ष सांगितल्याचा आरोप केला आहे.
हा प्रकार जाणीवपूर्वक राजकीय हेतू साध्य करण्याच्या व जनतेची दिशाभूल करण्याच्या वाईट हेतूने, भाजप पक्षाची व नगरसेवकांची बदनामी करणारा आहे, असाही आरोप नगरसेवक कंचर्लावार यांनी केला आहे. त्यामुळे गैरअर्जदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत मनपाचे उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेते संदीप आवारी यांची उपस्थिती होती.