कोरोनामुक्त ज्येष्ठ नागरिकांमध्ये ‘फ्रायब्रोसिस’च्या तक्रारी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 05:00 AM2020-12-18T05:00:00+5:302020-12-18T05:00:32+5:30

जे रुग्ण निमोनिया आणि कोरोना विषाणूच्या संसर्गाने ग्रस्त आहे. त्यांना या आजारातून बरे झाल्यानंतरही श्वसनाचा त्रास जाणवत असल्याचे काहींच्या लक्षणावरून दिसून येत आहे. कोरोनाच्या उपचारासोबतच फुफ्फुसाच्या सुरक्षेसाठी औषधोपचार केला जातो. अशा रुग्णांमध्ये फ्रायब्रोसिसचे प्रमाण कमी आहे. संसर्गामुळे फुफ्फुसावर उमटलेले व्रण सहजासहजी जात नाही. त्यासाठी आजारातून बरे झाल्यानंतरही फिजिओथेरपीची, श्वासाचे व्यायाम करावे लागतात.

Complaints of ‘fibrosis’ increased among corona-free senior citizens | कोरोनामुक्त ज्येष्ठ नागरिकांमध्ये ‘फ्रायब्रोसिस’च्या तक्रारी वाढल्या

कोरोनामुक्त ज्येष्ठ नागरिकांमध्ये ‘फ्रायब्रोसिस’च्या तक्रारी वाढल्या

Next
ठळक मुद्देअनेकांची तपासणी : डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळीच सुरू करा औषधोपचार

  लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाचा  प्रादूर्भाव आजही आहे. त्यामुळे प्रत्येकांनी स्वत:ची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. मात्र काही नागरिक दुर्लक्ष करीत असल्यामुळे ते आपले आरोग्य धोक्यात घालत आहे. कोरोना हा फुफ्फुसाशी निगडित आजार आहे. यातून फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. सुरुवातीच्या काळात काही लक्षणे नसल्याने रुग्ण डाॅक्टरांकडे जात नाही.  प्रकृती खालावल्यानंतर रुग्ण उपचारासाठी जातात. अशा रुग्णांना फुफ्फुसावर फ्रायबोसिस तयार होते. यातून अनेक आजारांना निमंत्रण मिळते. काही रुग्णांना व्हॅन्टीलेटर, सीपॅपची गरज पडते. अशा रुग्णांमध्ये फ्रायब्रोसिसचा त्रास बरे झाल्यानंतरही दिसून येत आहेत. त्यामुळे वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे.
जे रुग्ण निमोनिया आणि कोरोना विषाणूच्या संसर्गाने ग्रस्त आहे. त्यांना या आजारातून बरे झाल्यानंतरही श्वसनाचा त्रास जाणवत असल्याचे काहींच्या लक्षणावरून दिसून येत आहे. कोरोनाच्या उपचारासोबतच फुफ्फुसाच्या सुरक्षेसाठी औषधोपचार केला जातो. अशा रुग्णांमध्ये फ्रायब्रोसिसचे प्रमाण कमी आहे. संसर्गामुळे फुफ्फुसावर उमटलेले व्रण सहजासहजी जात नाही. त्यासाठी आजारातून बरे झाल्यानंतरही फिजिओथेरपीची, श्वासाचे व्यायाम करावे लागतात. यामुळे प्रत्येकांनी वेळीच काळजी घेऊन या आजारापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रुग्ण संख्या घटत असली तरी कोरोनाचे संकट अद्यापही संपले नाही.

कोरोनाबाधित ज्येष्ठ नागरिकांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. काही दिवस अडचणीचे जावू शकतात. मात्र त्यावर उपचार आहे. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य आहार व विहाराकडे लक्ष दिल्यास प्रत्येकांना निरोगी जीवन जगता येते.
- डाॅ. अविष्कार खंडारे 
वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका, चंद्रपूर

बरे झालेले रुग्णही येतात तपासणीसाठी
कोरोनातुन मुक्त झाल्यानंतर काही रुग्ण पुन्हा तपासणीसाठी येत आहेत. निमोनियाचे प्रमाण अधिक असल्यास कोरोनानंतर रुग्णांला फ्रायबोसिसचा त्रास जाणवतो. एकूण रुग्णांपैकी ५ ते ६ टक्के रुग्णांना हा त्रास जाणवतो. नियमित व्यायाम, औषधोपचार घेतल्यानंतर यातूनही रुग्ण बाहेर पडतात.

थकवा, श्वसनाचा जाणवतो त्रास
कोरोना आजार असलेल्यांना निमोनियाचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये फुफ्फुससावर परिणाम होता. यातून बरे झाल्यानंतरही फुफ्फुसाची काम करण्याची गती मंदावते. वारंवार थकवा येणे, सतत दम लावणे, खोकला या सारखे त्रास जाणवतात. संक्रमणामुळे फुफ्फुसावर आलेले व्रण कायमस्वरुपी राहतात. योग्य आहार घेतल्यास फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते.

वृद्ध नागरिकांनी काय काळजी घ्यायला हवी
कोरोनामुक्त झालेल्या वृद्ध नागरिकांनी शक्य झाल्यास योगा, श्वसनाचा व्यायाम, प्राणायाम करावा, शरीर सुदृढ ठेवण्यासाठी संतुलित आहार घ्यावा. मोड आलेले धान्य, दुधाचे पदार्थांचे सेवन करावे, याशिवाय जीवनसत्व देणारी फ‌ळे खावी, संत्रा, मोसंबी, आवळा या फळांचा अधिक वापर करावा. त्यानंतरही काही त्रास जाणवत असल्यात वेळोवेळी डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. ज्यांना अन्य आजार आहे, त्यांनी या आजारांकडे दुर्लक्ष करू नये, या आजारांचे औषध नियमितपणे सेवन करावे.

Web Title: Complaints of ‘fibrosis’ increased among corona-free senior citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.