पावसाळ्यापूर्वी सिमेंट रोडचे काम पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:35 AM2021-06-09T04:35:59+5:302021-06-09T04:35:59+5:30
बल्लारपूर : वैशिष्ट्यपूर्ण विशेष निधीअंतर्गत येथील गोरक्षण वॉर्डात पाच महिन्यांपासून सिमेंट रोडचे काम सुरू आहे. यामुळे गोरक्षण वॉर्डातील रहिवासी ...
बल्लारपूर : वैशिष्ट्यपूर्ण विशेष निधीअंतर्गत येथील गोरक्षण वॉर्डात पाच महिन्यांपासून सिमेंट रोडचे काम सुरू आहे. यामुळे गोरक्षण वॉर्डातील रहिवासी यांची रस्त्याची समस्या दूर होणार आहे. परंतु हे काम कासवगतीने चालले असून, पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
हे काम राज्य मार्गापासून, तर वन विकास महामंडळाच्या गेटपर्यंत असे पाच वेगवेगळ्या ठिकाणी होत आहे. या सिमेंट रोडवर दोन्ही बाजूने नाली आणि पेव्हर ब्लाॅकमुळे रस्ता शोभिवंत होत आहे. परंतु ठेकेदार जुन्या नालीवरच नवीन नाली बनवत असल्याने काम मजबूत होणार की नाही, अशी शंका नागरिक व्यक्त करीत आहे. या कामाकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत नगर अभियंता संजय बोढे यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, या कामाची देखरेख अभियंता जामूनकर यांच्याकडे आहे. त्यांच्या कार्यालयात विचारणा केली असता कळले की, ते आठवड्यातून दोन दिवसच पालिकेत उपस्थित राहतात.
नगर परिषदेने सिमेंट रोडच्या कामाकडे लक्ष द्यावे व पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करावे, अशी मागणी आहे.