जुलैअखेरपर्यंत पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 10:54 PM2019-06-24T22:54:50+5:302019-06-24T22:55:11+5:30

खरीप हंगाम तसेच शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासन आग्रही असून जुलैअखेरपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्यातील बँकांनी पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी सोमवारी वीस कलमी सभागृहात आयोजित बैठकीत उपस्थित बँकांच्या अधिकाऱ्यांना दिले.

Complete the crop allocation objective by July end | जुलैअखेरपर्यंत पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करा

जुलैअखेरपर्यंत पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करा

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : बँकांची आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : खरीप हंगाम तसेच शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासन आग्रही असून जुलैअखेरपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्यातील बँकांनी पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी सोमवारी वीस कलमी सभागृहात आयोजित बैठकीत उपस्थित बँकांच्या अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी जी. आर. वायाळ, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस. एन. झा, जिल्हा उपनिबंधक डी. आर. खाडे आदी उपस्थित होते. खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकºयांना ९८० कोटीचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट असून त्याला गती मिळावी याकरिता जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली बँकांनी केलेल्या पीक कर्ज वाटपासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कृषी यांत्रिकीकरण योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व एकात्मिक उद्यान विकास मिशन या योजनांसाठी वितरित कर्जपुरवठयाचा आढावा घेतला. पीक कर्जाची गरज व कर्ज मिळवण्यासाठी शेतकºयांना येत असलेल्या अडचणी जिल्हाधिकाºयांच्या समक्ष त्यांनी विषद केल्या. तत्पूर्वी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस. एन .झा यांनी कर्ज पुवठ्यातील जिल्ह्याची सद्यस्थितीचा आढावा घेत शेतकºयांच्या कल्याणाकरिता कर्ज पुरवठ्याचे महत्व सर्वांना सांगितले.
यावेळी जिल्हाधिकाºयांनी कर्जपुरवठा संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचा उल्लेख करत बँकांच्या अडचणी समजून घेत विविध निर्देश दिले. याप्रसंगी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, मुद्रा योजना आदी योजनांविषयी संपूर्ण माहिती असलेली जिल्हा अग्रणी बँकेने तयार केलेली जिल्हा वार्षिक कर्ज योजना २०१९-२० या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Complete the crop allocation objective by July end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.