कोठारी परिसरात पूर्णता संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:20 AM2021-04-29T04:20:28+5:302021-04-29T04:20:28+5:30
यंत्रणा सज्ज असल्याने रुग्णसंख्येत घट होताना दिसून येत आहे. कोरोना संकटावर मात करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. ...
यंत्रणा सज्ज असल्याने रुग्णसंख्येत घट होताना दिसून येत आहे.
कोरोना संकटावर मात करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती आणि राज्यात उद्भवलेली वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यात सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर तालुक्यातील तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या या मोठ्या नगरीत आणि परिसरात संसर्ग पसरू नये, यासाठी स्थानिक पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण यांनी परिसरातील व्यावसायिक, ग्रामपंचायत पदाधिकारी, आरोग्य विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन कोरोनावर मात करण्याचा एकजुटीने प्रयत्न करण्यात आला. कोठारी व परिसरातील बाजार, दुकाने बंद व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते११ वाजेपर्यंत सुरू आहेत. विदर्भातील प्रसिद्ध मिरची बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. कठोर निर्बंध व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याने काेरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात बऱ्याच प्रमाणात यश आले आहे.